Solapur News : जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तीन महिन्यातील पावसाची सरासरी १०६ टक्क्यांवर (३२३ मिमी) पोचली आहे. ऑगस्ट महिन्यात १०७ मिमी अपेक्षित पाऊस असताना प्रत्यक्षात १७४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. .दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ५२० मिमी (१४७ टक्के) तर सर्वांत कमी करमाळा तालुक्यात १८२ मिमी (६४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात करमाळा वगळता सर्वच तालुक्यात १०० ते २०० टक्के पाऊस झाला आहे.उत्तर सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ४६८ मिमी (१२५.४० टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या २१४ टक्के म्हणजेच २८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. .Rain Update : अमळनेर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस.द. सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ५२० मिमी (१४७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १८३ टक्के म्हणजेच २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बार्शी तालुक्यात आतापर्यंत ३७५ मिमी (१०५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १७२ टक्के म्हणजेच २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे..अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत ४५६ मिमी (१०५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १७३ टक्के म्हणजेच २३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोहोळ तालुक्यात आतापर्यंत ३२४ मिमी (११४ टक्के) पावसाची नोंद झाली. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १६८ टक्के म्हणजेच १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे..Rain Crop Damage : पावसामुळे पिके पाण्याखाली.माढा तालुक्यात आतापर्यंत २९४.८० मिमी (९७.९० टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १४४ टक्के म्हणजेच १६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. करमाळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत १८२ मिमी (६४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. .जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ४७.८० टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ९५ टक्के म्हणजेच ९२.७० मिमि पावसाची नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यात आतापर्यंत २३८ मिमी (७९.३० टक्के) पावसाची नोंद झाली. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ५८ टक्के पाऊस झाला होता, पण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के म्हणजेच १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.