Power Supply Disruption: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘महावितरण’चे १५०२ फीडर असून त्यावरून ११ लाख ३९ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मागील सहा-सात वर्षांपासून ‘लोडशेडिंग’ बंद झाले होते. शेतीसाठी दिवसा आठ तास वीज दिली जाते. मात्र, आता अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइनला कृषीपंप जोडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४७४ फीडरवरील (२५ एमपीआरपेक्षा जास्त लोड) वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका सुमारे ३०० गावांना बसत आहे..राज्य सरकारने एप्रिल २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत (एचपी) मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. ही योजना मार्च २०२९ पर्यंत लागू असून सोलापूरसह राज्यातील ४४ लाखांवर शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून पाणी द्यावे लागू नये, यासाठी दिवसा आठ तास वीज दिली जात आहे. तसेच ९० टक्के सवलतीत सौरपंप देणारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना’ देखील सुरू आहे. असे असूनही, शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप जोडत असल्याने घरगुती फीडरवरील भार वाढत आहे..Electricity Problem: वीज पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले.जिल्ह्यात ६७१ फीडरवर शेती व घरगुती ग्राहकांची एकत्रित वीज जोडणी आहे. त्यातील ४७४ फीडरवरून थ्री-फेज व सिंगल फेज असा दोन्ही पुरवठा होतो. थ्री-फेजमधून दिवसा आठ तास वीज दिली जाते आणि सायंकाळी ६ नंतर त्याच लाइनवरून घरगुती वापरासाठी सिंगल फेज पुरवठा केला जातो. मात्र, त्यावरही कृषीपंप जोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने, ३०० हून अधिक गावांत सध्या चार तासांचे भारनियमन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले..Power Supply Issue: अखंडित वीजपुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन.दुरुस्तीसाठी वीज बंद, तरीही अडथळेशहरात दर बुधवारी देखभालीसाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवला जातो. मात्र, वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. परिणामी, आठवड्यातील इतर दिवशीही वीज खंडित होत असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे..‘महावितरण’ची ग्रामीणमधील स्थितीएकूण फीडर : १,५०२शेती-घरगुती एकत्रित फीडर : ६७१‘एसडीपी’ फीडर : ४७४भारनियमनाची अंदाजे गावे : ३००.सोलापूर जिल्ह्यातील काही फीडरवर शेती व घरगुती अशी दोन्ही कनेक्शन आहेत. घरगुती ग्राहकांसाठीच्या १६ तासांच्या वीजपुरवठ्याचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच व्हावा. शेतीसाठी दिलेल्या दिवसाच्या आठ तासांतच पंपांचा वापर करावा. सिंगल फेजवर कोणीही कृषीपंप जोडू नये; भार वाढल्यास फीडर आपोआप बंद पडतो, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.