Solapur News : आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे..विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात हे प्रशिक्षण पार पडले, तर प्रात्यक्षिके हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत. पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा वेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात..Maharashtra Disaster Management: आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा.ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली. महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले गेले. .यामध्ये आपत्तीची ओळख, CPR, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण, प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे.रेखा राठोड, ऊर्मिला पवार, अरुणा राठोड, रूपाली दोरकर, दुर्गा बनसोडे, जयश्री भिसे, शुभांगी गवते, नागोबाई बिराजदार, चैताली सावंत, लावण्या गुंडला, सोनिया चौगुले, राजश्री दोरनहळ्ळी, आसमा शेख, पूजा जगताप, सुवर्णी गायकवाड या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. .Disaster Management : पोलादपूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज .प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आपदा सखीना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट देण्यात आले. बचाव कार्यात प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. महिलांचे बचाव करताना महिलाच पुढे आल्या तर कार्य अधिक प्रभावी होते..घटना घडली तर मी एखाद्याचा जीव वाचवू शकतो, हा विश्वास या प्रशिक्षणातून मिळाला आता या सखीना प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट देणार आहोत.- शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.