Solapur Agriculture Update: सोलापूर जिल्ह्यात पावसाने कमालीची ओढ दिली आहे. पावसाची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी अर्धवट ओलीवरच पेरणीला सुरवात केली आहे. ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण खरिपाचे क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ६३ हजार ९२२ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ४८ टक्के आहे. यामध्ये नगदी पीक असलेल्या सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून, बार्शी तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे. चालू वर्षी उडदाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे..सोलापूर जिल्ह्यात काही तालुक्यांत २५ टक्के, तर काही तालुक्यांत ५० टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्यातील जवळपास दोन महिने उलटले, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. शेतकऱ्यांनी आहे त्या ओलीवर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके सध्या उगवणीनंतरच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी आता पेरणीचा निर्णय घेतला आहे. .Kharif Sowing Update: जुलैच्या पावसाने खरिपाला दिलासा.मुख्यमंत्र्यांसह कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, रिकामे शेत ठेवून वर्षाचे अर्थकारण कसे चालवावे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांना ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी खरीप पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी सोयाबीन व तूर ही पिके कोळपणीच्या अवस्थेत आली आहेत. .मात्र, येत्या काळात दमदार पाऊस न झाल्यास या पिकांचे भविष्य धोक्यात येणार असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे..Sangli Sowing Update: सांगलीत खरिपाचा २८ टक्के पेरा.कडधान्यांमध्ये तूर,उडीद आघाडीवरकडधान्य पिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात २८ हजार ९४० हेक्टरवर तूर, तर २२ हजार ६८४ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. करमाळा तालुक्यात सर्वाधिक ९ हजार ५४५ हेक्टर, तर अक्कलकोटमध्ये ७ हजार ९४६ हेक्टरवर तूर पेरली गेली आहे. उडदाच्या बाबतीत करमाळा (६ हजार ५३४ हेक्टर) आणि अक्कलकोट (६ हजार १०४ हेक्टर) हेच तालुके पुढे आहेत. तर मूग पिकाची २ हजार १६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे..पशुपालक पट्ट्यात बाजरी, मक्याचा पेराज्या भागात मोठ्या प्रमाणात संकरित गाई व इतर पशुधन आहे, त्या भागात मका व बाजरी पिकाला पसंती दिली आहे. जिल्ह्यात ३० हजार २६८ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून, यामध्ये माळशिरस (६ हजार ९१८ हेक्टर) आणि करमाळा (६ हजार २५३ हेक्टर) हे तालुके आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ६ हजार ५४६ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली असून, सांगोला तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५८१ हेक्टर, तर माळशिरस तालुक्यात २ हजार १०१ हेक्टरवर बाजरीचा पेरा झाला आहे..सोयाबीनची विक्रमी पेरणी, बार्शी अव्वलजिल्ह्यात यंदाही शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे. जिल्ह्यात ७१ हजार ४८१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी एकट्या बार्शी तालुक्यात तब्बल ५७ हजार ८६२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, बार्शी तालुक्यातील एकूण खरीप पेरणीपैकी ८३.२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.