Solapur News : सोलापूर जिल्ह्यात नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे बुधवारी (ता. २४) सलग दुसऱ्या दिवशी भीषण पूरस्थिती कायम आहे. सीना, आदिला, खासापुरी आणि चांदणी नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. .त्यामुळे जिल्ह्यातील २९ गावे पूर्णपणे जलमय झाली आहेत. माढा, मोहोळ भागात बचाव कार्य आजही सुरू होतं. आज दुसऱ्या दिवशीही ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पुराचा फटका सर्वाधिक शेतीला आणि गावांना बसला आहेच. पण दळणवळणासह वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. .Maharashtra Flood: पावसामुळे १५ जिल्ह्यांत हाहाकार.सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने काल रात्रीपासून सोलापूरला जोडणारे सोलापूर -पुणे, सोलापूर,- विजयपूर सोलापूर- कोल्हापूर हे महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आले आहेत. मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात हजारो लोक विस्थापित झाले आहेत..पूरग्रस्त भागातून आतापर्यंत २०,००० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २.२२ लाख शेतकऱ्यांच्या जवळपास १.९५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. .Dharashiv Floods: खरडून गेलेल्या जमिनीच्या भरपाईचे निकष बदलणार.त्याशिवाय ५४१ घरे पूर्णपणे कोसळली तर ४,०५८ घरांत पाणी शिरले आहे. सोलापूरनजीक हिप्परगा तलावातून एकाच वेळी तब्बल ११,००० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आदिला नदीत मिसळत असून, नदी दुथडी भरून वाहते आहे..विस्थापित गावेशिंगेवाडी, पिठापूर, वाघेगव्हाण, मुंगशी, लव्हे, तांदूळवाडी, दारफळ, राहुलनगर, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, आवारपिंपरी, कपिलापुरी, बोपळे, पासलेवाडी, एकरूखे, मलिकपेठ, खरकटणे, कोळेगाव, आष्टे, घाटणे, शिरापूर, पीरटाकळी, शिंगोली, तरटगाव, शिवणी, अकोले (मं.), विरवडे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.