Farmer Relief : सोलापूर खरीप हंगामातील पर्जन्यमानाची तूट आणि अन्य दुष्काळी घटकांच्या आधारे सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. शासनाच्या २५ सप्टेंबरच्या निर्णयानंतर दुष्काळी उपाययोजनांना सुरुवात होणार असून, सोमवारपासून (ता. २८) पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या सोयाबीनसह मुग, उडीद, मका, कांदा तसेच फळबागा आणि ऊस पिकांच्या नुकसानीचीही नोंदी घेण्यात येणार आहेत. दरम्यान, पीक नुकसानभरपाईची रक्कम या शासन निर्णयातून अद्याप जाहीर झालेली नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीबाबत आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे..पंचनाम्यादरम्यान पिकांची प्रत्यक्ष स्थिती, नुकसानीचे स्वरूप आणि क्षेत्राची नोंद केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील पीक नोंद हा पंचनाम्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील पीक आणि महसूल अभिलेखावरील नोंद यांचा ताळमेळ तपासला जाण्याची शक्यता आहे. पिकांचे छायाचित्र आणि सात-बारा उतारा ही कागदपत्रेही महत्त्वाची ठरणार आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्राची छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल तयार केला जाणार आहे. याबाबत तालुकानिहाय पथकाला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे महसुल प्रशासनाकडून सांगण्यात आले..Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ.‘ट्रिगर-१’ म्हणजे काय‘ट्रिगर-१’ म्हणजे एखाद्या भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक संकेत शासनाच्या निकषांनुसार स्पष्ट होणे. हा टप्पा लागू झाल्यानंतर प्रशासनाला दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याची प्रक्रिया सक्रिय करता येते. यामध्ये प्रामुख्याने पिकांची स्थिती तपासणे, पंचनामे करणे, पाणी-चारा उपलब्धतेचे नियोजन करणे, रोजगाराची कामे सुरू करणे तसेच शासनाने ठरविलेल्या इतर सवलती लागू कर ण्याची कार्यवाही केली जाते..Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ.शेतकऱ्यांना विविध सवलती‘ट्रिगर-१’ लागू झाल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती देण्याची तरतूद आहे. कृषी पंपांच्या चालू वीजबिलातही सवलत मिळणार आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, रोजगार हमी योजनेत अधिकाधिक कामे सुरू करणे, अन्नधान्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत..११ तालुक्यात दुष्काळ जाहीर...उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे..जिल्ह्यातील ११ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन निर्णयानुसार सोमवारपासून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी तालुकानिहाय पथकांना पंचनामे करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कमी कालावधीत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. - एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.