Solapur News : जिल्ह्यात महापुराच्या पाण्याने ज्यांच्या ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे आज (रविवार) रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. पंचनामे झाल्यानंतर बुधवारपासून (ता. १ ऑक्टोबर) बाधित कुटुंबाला प्रत्येकी बँक खात्याच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची मदत देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. .महापुरामध्ये केलेले बचाव कार्य आणि मदत कार्य याची माहिती देण्यासाठी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, महापुरामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. .नदीतील व शेतातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे आणि बागांचे पंचनामे होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे शेती साहित्य (मोटर, पाइपलाइन, ठिबक यंत्रणा) यांचे नुकसान झाले आहे, त्याचेही पंचनामे केले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेली आहे, त्याचे देखील पंचनामे होणार आहेत..Rain Crop Damage : साताऱ्यात अतिवृष्टीचा साडेसहाशे हेक्टरला फटका.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले, महापुराने बाधित झालेल्या भागासाठी ५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या वाड्या वस्त्यांवर टँकर जात नाही, अशा भागात आतापर्यंत जवळपास चार हजार जारद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. .महापुराचा धोका कमी झाल्यानंतर या बाधित झालेल्या प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम व आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. या गावांची स्वच्छता करण्यासाठी बाधित तालुक्यासाठी प्रत्येकी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठी केलेल्या निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे पथक सध्या दोन शिफ्टमध्ये काम करत आहे..Kharif Crop Damage : पावसामुळे खरिपात हानी, रब्बीबाबत अपेक्षा.अक्षय पात्रकडून माढा तालुक्यातील पाच हजार जणांना मोफत भोजनअक्षय पात्र फाउंडेशनच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मोफत दोन वेळचे जेवण दिले जाणार आहे. या फाउंडेशनच्यावतीने सोमवारपासून (ता. २९) माढा तालुक्यातील पाच हजार जणांना दोन वेळेचे जेवण मोफत दिले जाणार आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहर, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर येथील बाधितांसाठी आणखी एक केंद्र सुरू करण्याचे आहे..ज्या गावात महापूर येऊन गेला आहे, त्या गावातील रस्त्यांवर मुरूम टाकण्याची मागणी पूरग्रस्तांमधून होत आहे. बाधित गावातील रस्त्यांचे मुरुमीकरण केले जाणार आहे. बाधित गावातील विद्यार्थ्यांचे दप्तरही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्या त्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शालेय साहित्य खरेदी करण्याचे लवकरच आदेश दिले जाणार आहेत. पुढील टप्प्यात बाधित गावातील नागरिकांसाठी आधार, रेशनकार्ड व इतर आवश्यक दाखले काढण्यासाठी शिबिर घेण्याचे नियोजन आहे.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.