ठळक मुद्देसदाभाऊ खोत माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होतेसदाभाऊंना शेतकऱ्यांनी घेरल्याने तेथून त्यांना काढता पाय घेतलाकाही ताळमेळ ठेवा की भाऊ, शेतकऱ्याचा संतप्त सवाल.Sadabhau Khot visits Flood Affected Madha : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. पिके तर उद्ध्वस्त झाली आहे. जनावारांना चारा नाही, अशी अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत आमदार सदाभाऊ खोत आज आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. पण यादरम्यान सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकरी संतप्त झालेले पाहून त्यांनी तेथून काढता पाय घेतला..''इतकं दिवस कुठं होता? २००९ मध्ये तुम्ही खासदाकीला उभं राहिला होता. त्यावेळी आम्ही तुम्हाला २० हजारांचा निधी दिला. तुमच्या गळ्यात पाच-पाच हजारांच्या माळा घातल्या. या गावानं प्रेम दिलं. लीडही दिलं. त्यानंतर तुम्ही आमच्या गावाला आला नाही. थेट इतक्या वर्षांनी आलात. हे आमचे म्हणणे आहे.'' असा संतप्त सवाल एका शेतकऱ्याने केला. २००९ मध्ये सदाभाऊ खोत यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती..Agriculture Crisis: पावसाने झोडपले अन् राजानेही मारले.दुसऱ्या एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडताना म्हटले, ''सगळं गाव रिकामं केलंय...हजार -दीड हजार जनावरे रस्त्यावर आहेत. मी तीन दिवस बीडीओ, तहसीलदार, कलेक्टर साहेबांना बोलतोय. खासदार साहेबांनी थोडा फार चारा दिला. जनावरांना चारा नाही. जनावरांचे काय आहे की नाही?, त्यांना चारा पाहिजे की... आरोग्य विभागानं फवारणी करावी... आरोग्य विभागानं म्हणायचं आमच्याकडं नाही, महसूलकडं जा. महसूलनं म्हणायचं कृषीकडे जा. काही ताळमेळ ठेवा की भाऊ.''.Farmer Death: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात.सदाभाऊ काय म्हणाले?आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज नाही, असेही एका शेतकऱ्यांना म्हटले. यावेळी सदाभाऊंनी, आज आम्ही तुमच्याबरोबर आहे. आपण वादविवाद करायला नको, अशी विनंती केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.