ठळक मुद्देकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केलीनुकसानीबाबत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्याअधिकाऱ्यांना त्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.Solapur Flood : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (दि. २७ सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा समस्या जाणून घ्याव्यात आणि लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत..गेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरणे यांनी माढा तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. ''आजसुद्धा सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. तरीदेखील भर पावसात पाहणी करत माझ्या शेतकरी बांधवांच्या संकटात सामील झालो. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी खात्री एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून सगळ्यांना दिली,'' असे भरणे यांनी म्हटले..Sadabhau Khot : 'गळ्यात पाच-पाच हजारांच्या माळा घातल्या, लीडही दिलं, इतकं दिवस कुठं होता?'; सदाभाऊंवर शेतकरी संतप्त.सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सीना आणि भीमा नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदी, नाले, ओढे, पूल अशा ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. .कृषिमंत्री भरणे यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी येथे पूरग्रस्त नागरिकांना गृहपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप केले..Rain Crop Loss : ‘साहेब, चांगलं पीक आलं, पण पावसानं सगळं नेलं.याआधी आज आमदार सदाभाऊ खोत यांनीही उंदरगाव येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इतके दिवस कुठे होता? असा सवाल त्यांना शेतकऱ्यांनी केला. .सिना कोळेगाव धरणातून विसर्ग वाढवलादरम्यान, सिना कोळेगाव धारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सिना कोळेगाव धरणातून आज एकूण ५५,४४० क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज दुपारी १.३० वाजता वाढ करून ६०,५०० क्युसेक एवढा करण्यात आला आहे..उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात दुपारी १.३० वाजता एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.