Solapur Farmers : सोलापुरातील शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ; नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा मोठा फटका!
PikVima : सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेला यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी पिकांची ८६ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असताना, त्यातील अवघ्या २ हजार ७६३.७९ हेक्टर क्षेत्रालाच विमा संरक्षण मिळाले आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली आहे.
solapur farmers turn away from crop insuranceAgrowon