Solapur News : सोलापूर जिल्हा ज्याला कोरडवाहू म्हणून ओळखलं जातं, जिथं पावसासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो, त्या जिल्ह्याने यंदा वेगळंच चित्र पाहिलं. पावसाने जणू रौद्ररूप धारण केलं. .शेतं, मळे, घरं, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या सगळं काही पाण्याखाली जाऊन बसलं. शेतकऱ्यांनी स्वप्नवत जपलेलं पीक मातीच्या कुशीऐवजी पाण्याच्या एका लाटेत गडप झालं अन् मागे उरला तो केवळ जगण्यासाठीचा आक्रोश !.अतिवृष्टिग्रस्त भागाच्या दौऱ्यात भेटलेला एकेक शेतकरी पावसात भिजत आपल्या मनाशी बोलतोय ‘‘देवा, वर्षानुवर्षं थेंबासाठी आसुसलो होतो, आणि यंदा ओसंडून दिलंस, पण एवढं दिलंस, की अंगण, शिवार, घरं सगळी बुडाली रे. शेतं हिरवी नाहीत आता, त्यांनाही जलसमाधी मिळालीय.’’ आजअखेर जिल्ह्यात ६०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मे महिन्यातील २०० मिलिमीटर धरला तर ८०० मिलिमीटर पाऊस पडलाय ..Crop Damage Compensation : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी ७२१ कोटी ९७ लाख रुपये भरपाई मंजूर.सोयाबीन, बाजरी, मका, भाजीपाला कुणाचं पीक पाण्याखाली नाही गेलं? पावसाच्या पाण्यानं धरणीला जीव नाही दिला, तर हळूहळू गुदमरायला लावलं. रस्ते खचले, नाले फुगले, शेतकऱ्यांच्या आयुष्याचं गणितच विस्कटलं. गुणाकार ही नाही अन् भागाकार नाही, अधिकच ही नाही रं आयुष्याचं गणित केवळ वजात गेलंय रं, अशी काहीशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे..Crop Damage Compensation : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी ७२१ कोटी ९७ लाख रुपये भरपाई मंजूर.आधी दुष्काळाने शेतकऱ्यांची छाती पोकळ केली होती, आता अतिवृष्टीने श्वास गुदमरवला आहे. दोन्ही टोकं शेतकऱ्यांवरच आलीत. घरातल्या लेकरांच्या तोंडाकडे पाहताना त्यांचा प्रश्न जळजळीत आहे ‘‘बाबा, उद्या काय खायला येणार? पिण्याच्या पाण्याचे काय ?’’.सोलापूरच्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश केवळ पाण्यात बुडालेल्या शिवाराचा नाही, तर भविष्यातल्या आयुष्याचा आहे. ‘‘पावसाची कृपा आणि कोप या दोन्हींमध्ये आम्हीच का भरडले जावं?’’ असा सवाल त्यांच्या डोळ्यांतून उमटतोय. जनावरे, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या, कांदा, सोयाबीन, मका, भाजीपाला सर्व पिकांची स्वप्नं वाहून गेली. आता राहिलंय फक्त पावसाच्या पाण्यात मिसळलेलं अश्रूंचं पाणी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.