Solapur News : सोलापूर जिल्ह्यामध्ये रविवारी (ता. २८) सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्रभर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस बरसत राहिला. रविवारी सकाळी नऊच्या नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दिवसभर मात्र ढगाळ वातावरण राहिले..दुसरीकडे सीना आणि भीमा नदीतील विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे महापूराचा धोका मात्र कायम आहे. शुक्रवारपासून (ता.२६) जिल्ह्यात पाऊस होतो आहे. काल शनिवारी दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर तो कोसळतच राहिला. आज पुन्हा रविवारी सलग तिसऱ्यादिवशी पहाटेपासूनच त्यात अधिक जोर राहिला. .Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप.सकाळी नऊच्या सुमारास मात्र तो थांबला. पण दिवसभर ढग मात्र कायम होते. जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, माढा, मंगळवेढा, सांगोला, करमाळा या भागात हा पाऊस झाला. शुक्रवार सायंकाळ ते काल शनिवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ४९.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील २९ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. यात सर्वाधिक नोंद सांगोला आणि माळशिरस तालुक्यांत झाली आहे. .सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३३१ मिलिमीटर म्हणजे २०८ टक्के पाऊस झाला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. सीना नदीत चांदणी, खासापुरीसह भोगावती नदीतून सुमारे सव्वालाख क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. .Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा.त्यामुळे सीना नदीकाठी पुन्हा एकदा पुराचा धोका वाढला आहे. त्याशिवाय दुसरीकडे वरच्या धरणाकडून उजनीत येणारा विसर्गही रविवारी १५ हजार ३८१ क्युसेक इतका होता. तर धरणातून पुढे भीमा नदीत ४० हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता..पाण्याखाली गेलेले बंधारे, पूल आणि रस्ते१. आंबेचिंचोली ते उचेठाण बंधारा२. पिराची कुरोली ते पट. कुरोली बंधारा३. पिराची कुरोली ते खळवे पूल४. अजनसोंड ते मुंढेवाडी बंधारा५. नळी ते बठाण बंधारा६. वाखरी लहान पूल७. पंढरपूर दगडी पूल व बंधारा८. शेळवे कासाळगंगा पूल९. सरकोली ते पुळुज बंधारा१०. सरकोली ते उचेठाण पुल११. सरकोली ते पुळुज बंधारा१२. पुळुज ते पुळुजवाडी ओढ्यावरील पुल१३. गुरसाळे ते कौठाळी बंधारा१४. माढा ते वैराग रस्ता१५. उळे ते कासेगाव रस्ता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.