Solapur News : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा व सीना नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जवळपास ७० टक्के खरीप पुराच्या पाण्यात गेला आहे. केवळ पिकेच नाही, तर हजारो हेक्टरवरील जमीनही खरवडून गेली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात शेती, माती, पिकांसह अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. .ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सरासरीच्या दीड पट पाऊस झाल्याने खरीप हंगामातील ७० टक्के क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात सोयाबीन, तूर, उडीद, ऊस आणि कांदा या पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. .Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश!.त्यात तुरीचे अंदाजे ८९.७५ कोटी रुपये, उडदाचे १३५.२५ कोटी रुपये, सोयाबीन १९०.१२ कोटी रुपये, मक्याचे ७४ कोटी रुपये, कांद्याचे ३७.५० कोटी रुपये रुपये आणि उसाचे ऊस: ४५० कोटी रुपये असे साधारण १००० कोटी रुपयांचा नुकसानीचा अंदाज आहे. .विशेषतः माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिणाम झाले आहेत. नदीकाठची अनेक शेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ऑगस्टमध्ये ९२ कोटी रुपयांचे नुकसान.सरसकट पंचनामे कराशेतांमध्ये अजूनही पाणी आणि चिखल असल्यामुळे नुकसान पंचनामे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रशासन सरसकट पंचनामे करण्याचा विचार करत आहे. .पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम नुकसान आकडेवारी जाहीर होणार आहे. शेतकऱ्यांनीही सरसकट पंचनामे करून, त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली असून, खरीप हंगाम संकटात सापडल्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.