Solapur News : तत्कालीन संचालकांनी केलेल्या मनमानी व नियमबाह्य कर्जवाटपामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली होती. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून २०१८ मध्ये प्रशासकांची नियुक्ती झाली. डबघाईला गेलेल्या जिल्हा बँकेने प्रशासकांच्या काळात पीककर्ज वाटपाचा आलेख चढता केला आहे..यावर्षी खरिपासाठी बँकेने ३३ हजार १९० शेतकऱ्यांना ४९५ कोटींचे वाटप केले आहे. बँकेचे सर्वाधिक कर्जवाटप रब्बीत होत असल्याने यंदाच्या रब्बीनंतर जिल्हा बँक पीक कर्जवाटपाचा नवा उच्चांक व विक्रम करण्याची शक्यता आहे..Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित.बिघडलेल्या बँकेला तत्कालीन प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी शिस्त लावली. त्यानंतर प्रशासक कुंदन भोळे यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासक आल्यानंतर ३६ हजार शेतकऱ्यांना ३२१ कोटींचे कर्ज वाटप करणाऱ्या बँकेने गेल्या वर्षी ८७ हजार शेतकऱ्यांना १३०९ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे..डीसीसीची वाढती कामगिरी कंसात शेतकऱ्यांची संख्या२०१९-२०२०खरीप : १३४ कोटी (१७६१८)रब्बी : १८६ कोटी (१९०२८)एकूण : ३२१ कोटी (३६६४६२०२१-२०२२खरीप : ३१४ कोटी (४०१६७)रब्बी : ४१७ कोटी (२४३४०)एकूण : ७३१ कोटी (६४५०७)२०२३-२०२४खरीप : ४७३ कोटी (३६२२६)रब्बी : ६९२ कोटी (४५४५४)एकूण : ११६६ कोटी (८१८६०).Crop Loan : पीककर्ज वाटपात लातूर जिल्ह्याची गाडी सुसाट.२०२०-२०२१खरीप : १५७ कोटी (२२९७३)रब्बी : २४४ कोटी (१८९३६)एकूण : ४०१ कोटी (४१९०९)२०२२-२०२३खरीप : ४५१ कोटी (३६८०५)रब्बी : ६७५ कोटी (४८४४८)एकूण : ११२६ कोटी (८५२५३)२०२४-२०२५खरीप : ५४६ कोटी (३९५८८)रब्बी : ७६२ कोटी (४८२७५)एकूण : १३०९ कोटी (८७८६३).सोलापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून डीसीसीची ओळख आहे. जिल्ह्याच्या विकासात डीसीसीचे पाठबळ मोलाचे मानले जाते. शेतकरी केंद्रबिंदू मानून डीसीसीचे कामकाज केले जात आहे. आमच्या सर्व टीमने केलेल्या कष्टामुळे बँकेची स्थिती सुधारली आहे. शेतकऱ्यांनी नियमित परतफेड करून व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ओटीएस योजनेला मुदतवाढ मिळाल्याने, थकबाकीदार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगल्या योजना राबविण्याचे नियोजन आहे.- कुंदन भोळे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.