Gram Sadak Project Maharashtra: प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यास शासनाकडून मोठा निधी मिळाला आहे. २०२५-२६ या वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील ४ रस्त्यांसाठी ७.६९ कोटींचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत चालू वर्षात निधी मिळाला नसला तरी मागील दोन वर्षांत (२०२४-२५ व २०२५-२६) जिल्ह्यातील ४०४ किमी लांबीच्या ९३ रस्त्याच्या कामांसाठी ६३९ कोटींचा निधी मिळाला आहे. सर्व कामे सुरू असून २०२७-२८ पर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत असल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयांकडून सांगण्यात आले. .मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०२४-२५ मध्ये ३५५ किमी लांबीचे ८१ कामांसाठी ५८१.३८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. ८१ कामांपैकी १३ कामे पूर्ण असून ४० हून अधिक कामे अंतिम टप्प्यात आहेत तर उर्वरित कामे पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहेत. २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातील ४९.७३ किमीच्या १२ कामांसाठी ५८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १२ कामांचे कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) देण्यात आले आहेत. ही कामे पूर्ण करण्याची मुदत २०२७-२८ पर्यंत आहे..Jalna District Development: जालना जिल्ह्याच्या विकासासाठी ५४७.९७ कोटींचा आराखडा मंजूर.त्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेंत २०२५-२६ या वर्षात सांगोला तालुक्यातील ६ किमी रस्ते कामांसाठी ७ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सांगोला तालुका आकांक्षित तालुक्याच्या यादीत असल्याने ही कामे मंजूर करण्यात आली आहे..Purandar Airport Development: पुरंदर विमानतळालगत नवे पुणे उभारा : गडकरी.रस्ते, पूलांसाठी नाबार्डकडूनही ६२.५३ कोटीदोन वर्षांपूर्वी ११ रस्ते व चार पुलांसाठी ६२ कोटी ५३ लाखांचा निधी मिळाला आहे. १५ कामे सुरू असून यातील पुलांचे काम पूर्ण झाली आहेत. यामध्ये सांगोला तालुक्यातील महदू-लवटे मळा, माळशिरसमधील बोंडले-शिंगोर्ली, बार्शीतील सावरगाव तर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी-तरटगाव या पुलांसाठी नाबार्डचा निधी मिळाला होता. याशिवाय ११ रस्ते कामेही पूर्ण करण्यात आल्याचे प्रधानमंत्री सडक योजना कार्यालयाकडून सांगण्यात आले..प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यास ६३९ कोटींचा निधी मिळाला आहे. शिवाय नाबार्डकडून मिळालेल्या निधीतून कामे करण्यात आली आहेत. २०२६-२७ या वर्षात फक्त सांगोला तालुक्यास निधी मिळाला आहे. इतर तालुक्यात सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणानंतर रस्ते व पुलांची अंतिम करण्यात येणार आहेत.- अमोल खमितकर, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री सडक योजना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.