Solapur DCC Bank Administrators Get Extension: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाईल, अशीच शक्यता होती. प्रशासकांना मुदतवाढ देताना सहकार विभागाने सप्टेंबरपर्यंत अथवा संचालक मंडळ येईपर्यंत, यापैकी जे अगोदर होईल, तोपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असल्याने पावसाळ्यात निवडणुका होत नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी तूर्तास तरी निवडणूक होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे..जिल्हा बँकेचे तत्कालीन चेअरमन राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ मे २०१८ मध्ये बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास आठ वर्षांपासून या बँकेवर प्रशासक कार्यरत आहेत. सध्या प्रशासक म्हणून कुंदन भोळे यांच्याकडे जबाबदारी आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासकांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीही प्रशासकांना टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ देत असताना नमूद कालावधी किंवा नवीन संचालक मंडळ येईपर्यंत अशीच अट घालण्यात आलेली होती. आताही तशीच अट घालण्यात आली आहे..Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ : आमदार जयंत पाटील .जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवावा लागतो. मतदार यादीवर दावे व हरकती घेऊन मतदार यादी अंतिम केली जाते..Kolhapur DCC Bank: ‘लाडक्या बहिणीं’साठी केडीसीसी बँकेकडून कर्जमर्यादा ५० हजारांपर्यंत.त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविला जातो. अद्यापपर्यंत संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत व मतदार यादीबाबत काहीच सूचना आलेल्या नाहीत. पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत. ही सर्व परिस्थिती पाहता बँकेची निवडणूक तूर्तास तरी शक्य नाही..मिश्र व्यवसाय वाढला, पण कर्जाची प्रकरणे तशीचजिल्हा बँकेचा मिश्र व्यवसाय दहा हजार कोटींच्या पुढे गेला आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली असल्याची एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे बिगरशेती कर्जाची जुनी प्रकरणे तशीच आहेत. या थकबाकीदारांकडून कर्जवसुलीसाठी आणखी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.