Solapur News: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानाअंतर्गत सोलापुरात बोगस नावांची शोधमोहीम सुरू आहे. त्यात आधार कार्डातील त्रुटी, दुबार नोंदी आणि अपात्रता या कारणांमुळे सुमारे १२ हजार संशयास्पद लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे, त्यापैकी ४,०७६ नावे आतापर्यंत कमी करण्यात आली आहेत. आता उर्वरित ८ हजार नावेही वगळण्यात येणार आहेत. .तपासणी दरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही अनेक जण अत्यल्प दरातील धान्याचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. ‘घरासमोर कार उभी आहे, तरीही स्वस्त धान्य लाटले जात आहे,’ अशा तक्रारींची दखल घेऊन पुरवठा विभागाने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे. अशा बोगस लाभार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत..Ration Card Verification : शिधापत्रिका तपासणी कामाला वेग.प्रामुख्याने आधार कार्डवरील माहिती आणि रेशन कार्डवरील माहितीमध्ये तफावत असणे, एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या रेशन कार्डवर असणे, लाभार्थी शहराबाहेर निघून गेले असणे किंवा त्यांचा मृत्यू झालेला असणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडली असतानाही रेशन कार्डचा वापर करणे, अशा मुद्द्यांवर ही पडताळणी होत आहे..Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता.अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यानुसार, संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तयार करून पुरवठा निरीक्षकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे..या तपासणीचा अहवाल तयार असून, नाव वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. ८ हजार नावांना लवकरच ऑनलाइन प्रणालीद्वारे मंजुरी मिळताच ही नावे कायमची रद्द होतील, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.