Cooperative Election : सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या (कॅडर) निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. कॅडरचे प्रशासक तथा शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी १ ऑगस्ट २०२६ या अहर्ता तारखेवर १ हजार २३२ सभासदांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केली आहे. या पार्श्वभूमीवर, सभासद संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचा ठराव घेण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत मुदत देण्यात आली आहे..१९७१ मध्ये कॅडरची स्थापना झाल्यापासून २०१७ पर्यंत जिल्हा बँकेचे संचालकच या संस्थेवर पदसिद्ध संचालक म्हणून काम पाहत होते. .District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी.मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि तत्कालीन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या निर्णयामुळे यंदा पहिल्यांदाच कॅडरसाठी स्वतंत्र संचालक मंडळ निवडले जाणार आहे. .Co-operative Elections : मतदान प्रतिनिधी ठरावाला ३,२६८ संस्था पात्र.एकूण १६ संचालकांच्या निवडीत तालुकानिहाय ११ संचालक (प्रत्येक तालुक्यातून १), महिलांसाठी २, तर अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि भटक्या जमातींसाठी (व्हिजेएनटी) प्रत्येकी १ जागा राखीव असेल. जिल्हा बँक आणि कॅडरचा मतदारसंघ एकच असल्याने, कॅडरवर जाणाऱ्या संचालकाकडे 'मिनी डीसीसी संचालक' म्हणूनच पाहिले जाणार आहे..तालुकानिहाय सभासद संख्याएकूण १२३२ मतदारांमध्ये पंढरपुरात सर्वाधिक १७८, माढ्यात १७३, बार्शीत १३४, माळशिरसमध्ये १३१ आणि मोहोळमध्ये १२० सभासद आहेत. याशिवाय करमाळा (११३), अक्कलकोट (८९), दक्षिण सोलापूर (८२), सांगोला (८१), मंगळवेढा (७९), उत्तर सोलापूर (५०) आणि इतर (डीसीसी बँक व गटसचिव संघटना) २ अशी सभासद रचना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.