APMC Updates : सोलापूर डाळिंबानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ड्रॅगन या परदेशी वाणाच्या फळाची आवक वाढली आहे. गुरुवारी एका दिवसात जवळपास २८ टन ड्रॅगन फळांची आवक झाली. त्यातून १४ लाखांची उलाढाल झाली. दरवर्षी या फळाची आवक वाढत आहे..व्हिएतनाममधून भारतात आलेल्या ड्रॅगन फळाची लागवड आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. प्रामुख्याने भांडवलदार शेतकरी या फळाचे उत्पादन घेताना दिसतात. या फळासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागते. सध्या बाजारात डाळिंबानंतर याच फळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे..Jaggery Market Trade: कोल्हापूर बाजार समितीत गूळ सौद्यात अडथळे कायम.पावसाळा सुरू झाल्यानंतर निवडुंग प्रजातीच्या या झुडपाला फुले येण्यास सुरुवात होते आणि महिनाभरात फळे काढणीस येतात. .Jaggery Rate: नीरा बाजार समितीत गुळाला ४५२५ रुपये दर.सध्या ड्रॅगन फळाचा काढणी हंगाम सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला या फळाला चांगला दर मिळत होता; मात्र आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. .सध्या उच्च दर्जाच्या फळाला प्रति दहा किलो १,००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गत पंधरवड्यात हाच दर दीड हजार रुपयांपर्यंत होता. सध्या सरासरी दर प्रति दहा किलो ५०० रुपये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.