Sustainable Agriculture: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत व हिरवळीच्या खताचा वापर करावा. त्यामुळे मातीची तसेच पिकांची गुणवत्ता सुधारते. तसेच माती परीक्षणामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे शक्य होत असून खतांचा अपव्ययही कमी होतो, अशी माहिती मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्र विशेषज्ञ विजय शिंदे यांनी दिली..कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्र, वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचावड व आघार खुर्द (ता. मालेगाव) येथे ‘रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि एल निनोच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना’ या विषयावर शेतकरी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत शिंदे यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याचे आवाहन केले..Soil Fertility Management: उसाच्या जोमदार वाढीसाठी पूर्वमशागत महत्त्वाची.अलनिनोच्या प्रभावामुळे चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची तसेच पावसाचे वितरण अनियमित होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या व दुष्काळसहनशील वाणांची निवड करावी. उपलब्ध सिंचन स्रोतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीमुळे हवामानातील अनिश्चिततेचा धोका कमी होण्यास मदत होते, असे मार्गदर्शनही त्यांनी केले..Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी गीतांजली लकारे यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. ट्रायकोडर्माची प्रति किलो बियाण्यास ३ ते ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति हेक्टर १० टन शेणखत वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. .सेंद्रिय खतांचा वापर केल्याने अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता वाढते व उत्पादनात वाढ होते. बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी तसेच शून्य किंवा कमी मशागत पद्धतीचा अवलंब करावा, अशी माहिती दिली. यावेळी शीतल सावळे यांनी आत्मा अंतर्गत गट स्थापन करण्याबाबत माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.