Mumbai News: अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहून आणि खरडून गेलेल्या जमिनींमध्ये टाकण्यात येणाऱ्या मातीला रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी, असा शासन आदेश महसूल विभागाने काढला आहे..जमिनीची बांधबंदिस्ती करण्यासाठी माती, मुरूम वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांकडून रॉयल्टी वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने परिपत्रक काढले आहे.या वर्षी राज्यभरामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील ६० हजार एकरांवरील जमीन खरडून गेली आहे..Land Disputes: बांधांवरून होणारे वाद मिटणार खासगी भूमापक करणार मोजणी.या जमिनी पूर्ववत करण्यासाठी तसेच मशागत योग्य करण्यासाठी राज्य सरकारने रोजगार हमी योजनेतून तीन लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे. तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४६ हजार रुपये देण्यात येणार आहेत..या जमिनीची बांध बंदिस्त करण्यासाठी धरणांमधील माती, गाळ तसेच अन्य ठिकाणचा मुरूम, दगड वापरण्याची मुभा दिली आहे. २०१९ पासून संबंधित घटकांसाठी रॉयल्टी माफ करण्यात आली होती. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावीस असे आदेश देण्यात आली आहे.Land Acquisition: जमिनीचे शासकीय दर अद्ययावत करूनच भूसंपादन करा.यासाठी संबंधित तहसीलदारांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवावा, ज्या भागामध्ये शेतजमिनी खरडून गेल्या आहेत किंवा नुकसानग्रस्त झाल्या आहेत तेथे बांधबंदिस्ती करण्यात येत आहे, अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना सूचना देऊन क्षत्रिय कार्यालयाने त्यासंदर्भात काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत..‘रॉयल्टी’च्या तक्रारीअतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच जमिनी खरडून गेल्या असून त्या जमिनी लागवडी योग्य करण्यासाठी माती, गाळ, मुरूम तसेच बारीक दगडांची आवश्यकता आहे. २०१९ पासून नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींचे घर, गुरांचा गोठा, शेत व विहीर याकरिता आवश्यक पाच ब्रास गौण खनिजाच्या वापरासाठी रॉयल्टी माफ करण्यात आली आहे..मात्र स्थानिक पातळीवरील अधिकारी शेतकऱ्यांकडून रॉयल्टी वसूल करत आहेत. या बाबतच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे शेत जमिनी लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी गौण खनिज सहज उपलब्ध करून द्यावे आणि त्याबाबतच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना द्याव्यात, असे शासन आदेश महसूल विभागाने काढले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.