Fertilizer Management: कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथे मृदा आरोग्य व्यवस्थापन, संतुलित खत वापर या विषयावर शेतकरी जनजागृती कार्यक्रम पार पडला..या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आयसीएआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजिनाथ दुकरे, डॉ. सुजन आदक, तांत्रिक अधिकारी रोहिणी खोबरागडे यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांना मृदेचे आरोग्य जपण्याचे महत्त्व आणि त्याचा पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले..Agriculture Workshop: महिला शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाचे धडे .मृदा परीक्षणावर आधारित खतांचा वापर केल्यास पोषक तत्त्वांचा योग्य उपयोग होऊन अनावश्यक खर्च टाळता येतो. रासायनिक खतांचा अति व अविचारी वापर केल्यास मृदेची गुणवत्ता खालावते, पोषणतत्त्वांचा समतोल बिघडतो आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले..Agriculture Workshop: वनस्पती अनुवंशिक संसाधनांच्या संरक्षणावर ‘केव्हीके’त कार्यशाळा.सेंद्रिय घटकांचा वापर वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. शिवाय गांडूळखत, कंपोस्ट, जैवखते, हिरवळीचे खत, बीजामृत आणि जीवामृत वापरामुळे मृदेची सुपीकता टिकून राहण्यात मदत मिळते असे सांगण्यात आले. .यावेळी राइझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी व अझोस्पिरिलम यांसारख्या जैवखतांच्या गुणवत्तेबाबतही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात २५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.