डॉ. गणेश पवारAgriculture Management: जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक अवस्थेवर पिकांची उत्पादकता अवलंबून असते. उसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी जमिनीची मशागत ही महत्त्वाची प्राथमिकता असते. ऊस पिकाला उत्तम घडणीची, मशागत केलेली, हवा खेळती राहणारी, निचरा चांगला असलेली, चुनखडी, क्षारता व घट्टपणा नसलेली ४० ते ६० सेंमी खोलीची जमीन विशेष मानवते. उभी आडवी दोन वेळा खोल नांगरट, घट्ट जमिनीत सबसॉयलरचा किंवा रोटाव्हेटरचा वापर, जमिनीचे सपाटीकरण, रुंद व लांब सऱ्या, उताराच्या जमिनीत सम पातळीत सऱ्या इत्यादी गोष्टीकडे लक्ष दिल्यास पीक वाढीस अनुकूल वातावरण तयार होते. निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खोदले म्हणजे क्षारतेचा प्रश्न कमी होतो. .जमीन सुपीकता पातळी वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, प्रेसमड केक, गांडूळ खत, कोंबडी खत, लेंडी खत, मासळी खत, गोबर गॅस स्लरीचा वापर करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी वाढून उत्पादन पातळीही वाढते. जमिनीच्या भौतिक व जैविक नियोजनाला विशेष महत्त्व असते. भर खतांच्या वापराने हे दोन्ही हेतू साधतात. जमीन ही सजीव आहे. ती विविध प्रकारच्या थरांनी बनलेली असते. या थरांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. या फरकाचा जमिनीच्या संरचनेवर व पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असतो..Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर.ऊस पिकासाठी चांगल्या प्रकारची निचरा होणारी गाळाची सुपीक मृदा आवश्यक असते. जमिनीचा सामू हा सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा. ऊस पीक गाळाच्या जमिनीत ते वालुकामय जमिनीत घेतले जाते. हे पीक आम्लयुक्त तसेच अल्कलीयुक्त जमिनीत तग धरून येऊ शकते म्हणून ५ ते ८.५ या श्रेणीच्या सामूमध्ये सर्वत्र घेतले जाते. ऊस पीक बागायती असल्यामुळे जमिनीत १ ते ३ टक्के उतार जमिनीस द्यावा, त्यामुळे पाण्याचे वितरण हे चांगल्या प्रकारे होईल..भारी व खोल जमिनीस जास्तीच्या उताराची गरज असते, ज्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल. पिकांच्या मुळांसाठी चांगले वातावरण तयार होण्यासाठी एक मीटर पर्यंत चांगल्या प्रकारच्या मृदेची संरचना असावी लागते. मातीच्या कणांमधील पोकळी ही कमीत कमी ५० टक्के असावी. चांगला निचरा होणारी व जमिनीतील पाण्याची पातळीची खोली ही १.५ ते २ मीटर आणि उपलब्ध पाणी धरून ठेवण्याची क्षमता प्रतिमीटर खोलीसाठी ही १५ सेंमी असायला हवी..Sugarcane Farming: उसावर लोकरी माव्याचा अडकूर भागात प्रादुर्भाव .मृदा प्रकार आणि गुणधर्मगाळाची मृदा, काळी कापसाची मृदा, लाल आणि जांभा मृदा या मृदेमध्ये ऊस लागवड केली जाते. गाळाच्या मृदा उदासीन ते क्षारपड, मध्यम सुपीकतेच्या व चांगले पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या असतात..दख्खन कालवा विभागातील मृदा प्रकारात महाराष्ट्र, कर्नाटकाचा काही भाग, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरातच्या काही भागामध्ये काळी कापसाची मृदा आढळून येते. या जमिनीचा सामू हा सर्वसाधारणपणे अल्कली प्रकारातील असतो. या जमिनी हलक्या ते भारी प्रकारातील असतात. या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्याधिक असते व त्या जमिनींना निचरा होण्यासाठी चर करून द्यावे लागतात. या जमिनीची पाणी मुरण्याची, हवा व पाणी संप्रेषण करण्याची क्षमता कमी असते..जमिनीचा घट्टपणा, कमी निचरा प्रणाली, वायुवीजन अल्कलीयुक्त आणि क्षारपड जमिनी या मुख्य समस्या आहेत. चुनखडीमुळे होणारा हरितरोग हा सर्वसामान्यपणे या मृदेत दिसून येतो म्हणून अशा जमिनीस प्रत्येक वर्षी सेंद्रिय पदार्थ मिसळावे लागतात. त्याचप्रमाणे दोन ते तीन वर्षातून खोल नांगरणी व चांगली निचरा प्रणाली करावी लागते..तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या भागातील जमिनीमध्ये ऊस घेतला जातो. या जमिनी कमी ते मध्यम खोलीच्या असतात. सुपीकतेच्या बाबतीत कमी प्रतीच्या असतात. परंतु चांगल्या निचऱ्याच्या असतात. त्याच बरोबर कमी पाणी धारणक्षमता असणाऱ्या व उदासीन ते आम्लयुक्त सामू प्रकारातील असतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे कमीच असते. या जमिनी सँडीलोम ते लोम या संरचना प्रकारातील असतात. या जमिनीतील ऊस हा नत्र व पाण्याला चांगला प्रतिसाद देणार असतो.- डॉ. गणेश पवार ९६६५९६२६१७(लेखक ऊस पीक अभ्यासक आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.