Ashok Deshmane: ‘स्नेहवन’ ही पुण्यातील संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व संगोपनाची जबाबदारी सांभाळत आहे. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून अर्चना आणि अशोक देशमाने या दांपत्याने हे सामाजिक कार्य उभारले असून सध्या १५ जिल्ह्यांतील ७० मुले येथे शिकत आहेत.