Mumbai News : पडघा (जि. ठाणे) येथे अनुदानित युरियाचा काळाबाजार करून औद्यागिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या गोडाऊनवर छापा टाकून १ कोटी २८ लाख ७३६ रुपयांचा युरिया जप्त करण्यात आला. ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या गुणनियंत्रण विभागाने छापा टाकून ही कारवाई केली..ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील लॉजिस्टिक पार्कमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पडघा पोलिसांत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडघा पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार दादासो एडके यांना मुंबई नाशिक महामार्गावर एका ट्रकमधून युरिया तस्करीसाठी जात असल्याचा संशय आला..Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र.त्यांनी ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाचे निरीक्षक विवेक दोंदे यांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. त्यानुसार दोंदे यांनी ट्रकची तपासणी आणि ट्रकचालकाची चौकशी करून त्याच्याकडे ग्रेड युरियाची बिले मागितली. मात्र ट्रकचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हे खत लॉजिस्टिक पार्क मधील गोडाऊनमधून भरल्याचे सांगितले. त्यानंतर दोन ट्रकसह पथक लॉजिस्टिक पार्कमधील गोडाऊनजवळ आले..तेथे छापा मारला असता नऊ कामगार अनुदानित कृषी युरियाच्या बॅगांमधील युरिया, औद्योगिक वापरासाठीच्या टेक्निकल ग्रेड युरिया खताच्या गोण्यामध्ये भरून रि-पॅकिंग करण्याचे काम करत असल्याचे आढळले. या गोडाऊनचा परवानाही नव्हता. तेथे तपासणी केली असता पांढऱ्या रंगाच्या औद्योगिक वापरासाठीचे प्लॅस्टिक गोणीतील युरिया खताच्या १२१७ गोण्या, पिवळ्या रंगाच्या शेती उपयोगी वापराच्या युरिया खताच्या ५१ गोण्या, औद्योगिक वापरासाठीच्या प्लॅस्टिक गोणीतील संशयित युरिया खताच्या १४०० गोण्या दोन ट्रकमध्ये आढळल्या..Urea Shortage: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केंद्र सरकारचा दावा फोल.युरियाच्या पिवळ्या व सफेद रंगाच्या रिकाम्या गोण्या, गोणी शिलाई मशीन, नायलॉन दोऱ्यांचे बंडलही घटनास्थळी सापडले. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश १९८५, खत वाहतूक नियंत्रण आदेश १९७३, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार कृषी विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे..विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंदे यांच्या पथकाने कारवाई केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.