Parbhani News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक २ मध्ये परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १७३ गावांची निवड झाली आहे. त्यापैकी ९५ गावांचे सूक्ष्म स्तर नियोजन (एमएलपी) व पाणी ताळेबंद (वॉटर बजेट) पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप ८ तालुक्यांतील ७८ गावांचे सूक्ष्म स्तर नियोजन तसेच पाणी ताळेबंद अपूर्ण आहे. .जिल्ह्यातील अनेक गावांचे नियोजन रेंगळल्यामुळे शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ देण्यासाठी आवश्यक ग्रामविकास आराखडे तयार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.ग्रामपंचायत अंतर्गत शेती हा महत्त्वाचा विषय आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा क्रमांक २ मध्ये निवड झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतींचे सरपंच हे गाव कृषी विकास समितीचे अध्यक्ष आहेत..Krushi Sanjeevani Project : कृषी संजीवनी प्रकल्पात नाशिकमधील ५३२ गावांचा समावेश.गाव पातळीवर योग्य नियोजन करून या प्रकल्पांची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी यासाठी फेब्रुवारी, मार्च महिन्यात सरंपंचाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्यानंतर अनेक गावांमध्ये ग्रामसभा आयोजित केल्या. शिवार फेऱ्या काढण्यात आल्या. श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. गावाच्या तसेच गावातील शेतकऱ्यांच्या गरजांनुसार सूक्ष्म स्तर नियोजन तसेच पाण्याचा ताळेबंद तयार जिल्हास्तरावर सादर करण्यात आले..गावाचे सूक्ष्म स्तर नियोजन व पाण्याचा ताळेबंद जिल्हास्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर गाव विकास आराखडा तयार केला जातो. त्यानंतर वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत फळबाग लागवड, तुषार, ठिबक संच, शेततळे, शेडनेट, पॉलिहाऊस, बीजोत्पादन, रेशीम शेती आदी घटकांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होते..e-Sanjeevani OPD : ‘ई-संजीवनी ओपीडी’मुळे एक लाखांहून अधिक रुग्णांना सेवा.वारंवार सूचना देऊनही या कामी अनेक ग्रामपंचायती उदासीन आहेत.जिल्ह्यातील १७३ पैकी सेलू तालुक्यातील सर्व १७ गावांसह एकूण ९५ गावांचे सूक्ष्म नियोजन व पाणी ताळेबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. उर्वरित ८ तालुक्यांतील ७८ गावांतील सूक्ष्म स्तर नियोजन तसेच ताळेबंद रखडले आहे. .परभणी जिल्हा नादेकृसं प्रकल्प सूक्ष्म नियोजन, पाणी ताळेबंद स्थितीतालुका समाविष्ट गावे सूक्ष्म नियोजन व पाणी ताळेबंद पूर्ण गावेपरभणी २६ १२जिंतूर ३३ १५सेलू १७ १७मानवत ८ ५.पाथरी १४ ११सोनपेठ १५ ६गंगाखेड २५ ९पालम १६ ४पूर्णा १९ १६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.