Raigad News: अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात येणाऱ्या सिनारमास कंपनीसाठीच्या पोहोच रस्त्यात लाखो कांदळवनाची झाडे नष्ट होणार आहेत. मागील महिन्यात कांदळवनाची कत्तल रोखण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आठवडाभर शेताच्या बांधावर उभे राहात लढा लढला. या लढ्यानंतर येथील शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे. .शहापूर औद्योगिक क्षेत्राला २००६ पासूनच स्थानिक शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. त्या काळात रिलायन्स व टाटा पॉवरचे प्रकल्पही लोकविरोधामुळे थांबले होते. तरीही स्थानिकांची मते, आक्षेप आणि विश्वास बाजूला सारून एमआयडीसी सिनारमास हा नवा प्रकल्प रेटत आहे. यासाठी आवश्यक रस्ता तयार करण्याच्या कामात कायदा, सरकारचे निर्देश आणि पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणावर कांदळवनांची कत्तल केली जात आहे..Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था.सदरचे आंदोलन १५ नोव्हेंबरपासून सुरू होते. शाहापूर परिसरातील सुमारे ४०० ते ५०० मीटर कांदळवनाची बेकायदेशीर कत्तल पोहोच रस्त्यासाठी केली जाणार असल्याचे आरोप मूळच्या शहापूर येथील पनवेल शहर भाजप नेत्या पल्लवी पाटील यांनी केला आहे..Wai Tree Cutting Protest : झाडे वाचली, सावली टिकली ; वाईकरांची एकजूटीचे फलित.तालुक्यात सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हा विध्वंस उघडपणे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे कारवाईची मागणी करणार आहे..सर्व्हे नंबर ५९६/अ मध्ये झालेला हा विध्वंस स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली, मात्र पोयनाड पोलिस ठाण्याने लेखी तक्रार घेण्यास नकार दिली. शेतकऱ्यांच्या हक्कांवर आणि पर्यावरणावर असा खुलेआम आघात होत असेल, तर आम्ही धाकटे शहापूर, धेरंड येथील शेतकरी शांत बसणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही, यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत.- पल्लवी पाटील, भाजप नेत्या.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.