Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १२ फुटांवरून १३ फुटांपर्यंत उघडून ९५,३०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. .कोयना धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता १०५.२५ टीएमसी असून बुधवारी (ता. २०) सकाळी नऊपर्यंत १०१.४७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण ९३.६६ टक्के भरले आहे. मंगळवारी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला असून २४ तासांत सरासरी ३६.३ मिमी पावसाची नोंद झाली..जिल्ह्यात सकाळी नऊपर्यंत धोम धरणात १३.१८ टीएमसी पाणीसाठा झाला असून ९७.८५ टक्के धरण भरले आहे. धरणातून १७,२७४ क्युसेक पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात जोडले जात आहे. धोम-बलकवडी धरणात ३.८२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून ९७.७९ टक्के धरण भरले आहे, धरणातून ७३२९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. .Satara Rain : दमदार पावसामुळे साताऱ्यातील पाच धरणांतून विसर्ग सुरू.कण्हेर धरणात ९.७५ टीएमसी पाणीसाठा झाला असून ९६.९३ टक्के धरण भरले आहे, धरणातून १४,८२३ क्युसेक विसर्ग होत आहे. उरमोडीत ९.७२ टीएमसी पाणीसाठा झाला असून ९८.२९ टक्के धरण भरले असून धरणातून ८९३६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तारळीत ५.४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून ९४.२८ टक्के धरण भरले आहे, .धरणातून ४४३५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. वीर धरणात ९.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून ९६.५० टक्के धरण भरले आहे, धरणातून ५५,८८७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील विसर्गामुळे कृष्णा, कोयना, तारळी, उरमोडी या नद्या दुधडी भरून वाहत असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला असून सर्वच तालुक्यात पाऊस झाला आहे..Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस.१२९ कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतरकोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, हायस्कूल, शाळा, काहींना नातेंवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. .यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात १३, हेळवाक येथील पाच, नावडी, औंध वस्ती येथील सात, कऱ्हाड तालुक्यातील सहा कुटुंबे, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील आठ कुटुंबांचे, वाई शहरातील ४० कुटुंबे, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील ३० कुटुंबे, मोरेवाडी येथील २० कुटुंबे अशा एकूण १२९ कुटुंबांतील ३६१ जणांचे स्थंलातर करण्यात आले आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्येसातारा - ४५.२, जावळी - ३९.४, पाटण - ३४.५, कराड - ३३, कोरेगाव - ४५.४, खटाव - १९.६, माण - ९.१, फलटण - १२.२, खंडाळा - २१.८, वाई - ४६, महाबळेश्वर - १५६.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.