Latur News: लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा बँकांचा अपवाद सोडला तर एकाही बँकेने पीक कर्जाचे वाटप अद्याप सुरु केलेले नाही. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरु राहिल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही उशीर झाला. त्यामुळे कर्ज वाटपामध्ये बँकांचा निरुत्साह आहे की रब्बी पेरण्यांमध्ये व्यस्त शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी होत नाही, याबाबत संभ्रम आहे. .या स्थितीत रब्बी हंगामाचे ६४१ कोटी ८५ लाख रुपये उद्दिष्ट असताना जिल्ह्यातील २२ पैकी केवळ सहा बँकांनी १६४ कोटी ८८ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वाटप २६ टक्के असून यात खरीपाप्रमाणे रब्बी हंगामातही लातूर जिल्हा बँकेने कर्ज वाटपात आघाडी कायम ठेवली आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत १३ हजार १५८ शेतकऱ्यांना १३० कोटी ८९ लाखाचे वाटप करून ७३ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे..Crop Loan Recovery: शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती.यंदा खरीप हंगामामध्येही प्रमुख तीन बँकांचा अपवाद सोडला तर उर्वरित बँकांनी हात ढिल्ला सोडला नाही. डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, एयु, एक्विटाज, इंदुसद, कोटक व इंडियन ओव्हरसिज बँकांनी खरीप हंगामात एक रुपयाचे कर्ज वाटप केले नाही. युनियन बँक ऑफ इंजडिया व आयडीबीआय या बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ एक तर बँक ऑफ इंडियाने उद्दिष्टाच्या दोन टक्के कर्ज वाटप केले..पंजाब नॅशनल बँकेने सहा, कॅनरा बँकेने नऊ, युको बँकेने १७, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १८, अॅक्सीस बँकेने २१ तर इंडियन बँकेने २७ टक्के कर्ज वाटप केले. बँक ऑफ बडोदाचे ६१ टक्के कर्ज वाटप सोडल तर उर्वरित बँका ४५ टक्क्याच्या पुढे गेल्या नाहीत. रब्बी हंगामातही बँकांनी कर्ज वाटपाबाबत उदासीन भूमिका कायम ठेवल्याचे चित्र आहे. हंगामात सहा बँका सोडल्या तर उर्वरित १६ बँकांनी अद्याप कर्ज वाटप सुरु केलेले नाही..Rabi Crop Loans: रब्बीत केवळ ९ टक्के पीक कर्जाचे वितरण.आतापर्यंत बँक ऑफ महाराष्ट्राने सहा हजार ३१९ शेतकऱ्यांना साडेसात कोटीचे वाटप करून १४ टक्के, भारतीय स्टेट बँकेने ४८६ शेतकऱ्यांना दहा कोटी ३० लाखाचे वाटप करून सात टक्के, एचडीएफसी बँकेने १६८ शेतकऱ्यांना सहा कोटी १२ लाखाचे वाटप करून २२ टक्के, आयसीआयसी बँकेने २२७ शेतकऱ्यांना सहा कोटी ६७ लाखाचे वाटप करून ३६ टक्के व महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४० शेतकऱ्यांना ९६ लाखाचे वाटप करून आठ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे..कर्जमाफीच्या चर्चेचाही परिणामकाही महिन्यांपासून कर्जमाफीची चर्चा सुरु झाली आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांसह अन्य संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचाही परिणाम पीक कर्ज वाटपावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. थकीत कर्जदारांनाच कर्जमाफी मिळत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. यामुळे शेतकरी कर्जाचे नूतनीकरण करून नवीन कर्ज न घेता ते थकीत ठेवण्यावर भर देत आहेत. अतिवृष्टी अनुदान व रब्बीच्या अनुदानामुळेही शेतकऱ्यांकडे पैसा आला असून त्यामुळे तातडीच्या आर्थिक गरजा भागल्याने शेतकरी कर्ज घेण्यास पुढे येत नसल्याची चर्चा बँकांच्या वर्तुळात आहे..खरीप हंगामातील कर्जवाटपएकूण उद्दिष्ट - दोन हजार ४५८ कोटी १४ लाखएकूण वाटप - दोन हजार २२४ कोटी २३ लाखलाभार्थी शेतकरी - दोन लाख ४० हजार ३९४लातूर जिल्हा बँकेचे वाटप - एक हजार २९२ कोटी (उद्दिष्टाच्या १३८ टक्के).जिल्हा बँकेचे लाभार्थी शेतकरी - एक लाख ५९ हजार २९६भारतीय स्टेट बँकेचे वाटप - ४६५ कोटी ९८ लाख (उद्दिष्टाच्या शंभर टक्के)स्टेट बँकेचे लाभार्थी शेतकरी - ४५ हजार ९८९महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप - २५४ कोटी ३५ लाख (उद्दिष्टाच्या ९६ टक्के)ग्रामीण बँकेचे लाभार्थी शेतकरी - २२ हजार तीन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.