Water Leakage: सिन्नर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी दारणा नदी ते सिन्नर ही मुख्य जलवाहिनी पळसे गावात बुधवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास फुटली. चार महिन्यांतील ही दुसरी घटना असून, लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे..पळसे येथील गट नं. ११८६ मधील रहिवासी विष्णू देवराम गायखे यांच्या घराशेजारील जलवाहिनी अचानक मोठ्या आवाजासह फुटली. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की, क्षणात परिसरात पाण्याचे लोट वाहू लागले. विष्णू गायखे यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत एमआयडीसी प्रशासनाला माहिती दिली, त्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, तोपर्यंत पाणी शेजारील शेतांमध्ये घुसले होते..Major Pipeline Burst: सिन्नरला दारणा योजनेची जलवाहिनी फुटली.जलवाहिनी फुटल्याने जगन गायखे यांच्या गट नं. ११८० मधील कोबीचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले. यामुळे त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अंबादास गायखे यांच्या शेतीलाही मोठा फटका बसला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाणी जपून वापरण्याची गरज असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचल्याने वाहनचालकांचेही हाल झाले..Water Supply Issues: चाकणमधील पाणीपुरवठा योजनेची आर्थिक कोंडी.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे..जलवाहिनी ३०-३५ वर्षांपूर्वीची जीर्णपळसे गावातून जाणारी ही जलवाहिनी सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. सध्या ही वाहिनी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून, पाण्याचा दाब सहन न झाल्याने ती वारंवार फुटत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवासी आणि शेतकरी संतप्त झाले असून, ही जलवाहिनी तातडीने बदलण्याची मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.