Parbhani News: सिंगणापूर (ता. परभणी) येथे महसूल मंडळास्तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शनिवारी (ता. १४) घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभागासहित विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एकाच दिवसात १ हजार ४१ लाभधारकांना लाभ वितरित करण्यात आले..जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, सिंगणापूर येथील प्रशासक तथा सरपंच शारदा पांडुरंग खिल्लारे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, उपअधीक्षक भूमिअभिलेख सुनील मोरे, तालुका कृषी अधिकारी विजयकुमार नांदे, प्रगतीशील शेतकरी एकनाथराव साळवे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले,.Revenue Camp: ब्राह्मणगाव येथे महाराजस्व शिबिराचे आयोजन.की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गावात येऊन थेट नागरिकांच्या समस्या ऐकत आहे.विविध विभाग या अभियानात सहभागी झाले आहेत. नागरिकांना कुठलाही त्रास न होता सुलभपणे लाभ मिळून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या शिबिरात महसूल विभागामार्फत ४३ प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. १२० डिजिटल सातबारा, ११०,आठ-अ कागदपत्रचे वाटप करण्यात आले. .Revenue Camp: निलजगाव, तुर्काबाद येथे महसूल समाधान शिबिर.७ अर्जावर एक खिडकीतून कार्यवाही करण्यात आली. निराधार योजनेचा ३५ लाभार्थींना लाभ मंजूर करण्यात आला. पुरवठा विभागाचे ४२ तर १४७ विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. तसेच रोजगार हमी विभागाचे १२, महिला व बालविकास ५० पंचायत समिती घरकुल लाभार्थी २९, जिल्हा कौशल्य विभाग २६, आयुष्मान भारत कार्ड ६८ नोंदणी व मुद्रांक विभाग १६, पशुसंवर्धन विभाग १५१, तालुका कृषी अधिकारी कार्यालय ३८, आर्थिक साक्षरता ४०, जिल्हा महिला बालविकास ४१, आधार केंद्र १३, भूमिअभिलेख विभागाच्यावतीने ४२ लाभ वितरित करण्यात आले. शिबिरात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुखांनी नागरिकांना योजनांविषयी मार्गदर्शन केले..शिबिरास मंडळातील नागरिक, शेतकरी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महसूल मंडळातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सिंगणापूर महसूल मंडळ अधिकारी प्रवीण खाडे, सिंगणापूर महसूल मंडळातील ग्राम महसूल अधिकारी संजय गोटे, रोहित ढवळे, रघुनाथ फलफले, दीक्षा खंदारे, प्रणिता वाघमारे, कांचन वसेकर, ग्रामपंचायत अधिकारी रामकुमार पवार, उपकृषी अधिकारी ज्ञानेश्वर माने, सहायक कृषी अधिकारी अविराज गोरे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, विविध विभागांचे ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.