Weekly Markets Issue: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी (ता.२१) पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. जिल्ह्यातील कणकवली, ओरोस परिसरांत विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाने झोडपून काढले. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागात देखील पावसाचे वातावरण होते. दरम्यान, पावसामुळे आठवडाबाजारातील भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली..हवामान विभागाने जिल्ह्यात १९ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत पावसाचा अंदाज दिला होता. गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी (ता.२०) मध्यरात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. .Pre Monsoon Rain Impact: पूर्वमोसमीच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम.दरम्यान, मंगळवारी सकाळी कणकवली तालुक्यातील घाटपायथ्याच्या गावांमध्ये विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर घाटपायथ्याच्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कणकवली, ओरोस जोरदार पावसाला सुरुवात झाली. कणकवलीला पावसाने झोडपून काढले. या पावसाचा मोठा परिणाम कणकवली आठवडाबाजारावर झाला. भाजीपाला, फळविक्रेत्यांची चांगली तारांबळ उडाली..Pre Monsoon Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा गव्हाला फटका.जिल्ह्याच्या उर्वरित भागात देखील पावसाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण आहे..दरम्यान, पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अलीकडेच आंबा काढणीला सुरुवात झाली आहे. गेल्या चार पाच दिवसांत आंबा काढणीला वेग आला आहे. अगोदरच मोहर करपल्याने आंबा पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे फळगळ देखील झाली. काही ठिकाणी आंबा करपल्याचे देखील प्रकार झाले आहेत. त्यातच आता पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.