Weather Update: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात पावसाचा जोर आता पूर्णपणे कमी झाला असून, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले वादळी वारेही थांबले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पाणथळ क्षेत्रातील भातरोप पुनर्लागवडीच्या कामांना वेग दिला आहे..जिल्ह्यात १ ते ७ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मोठे नुकसान केले. या कालावधीत घरे, गोठे व इतर मालमत्तांचे मिळून ९२ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. .Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम.बुधवारी दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी (ता. ९) सकाळपासूनही जिल्ह्यात अधूनमधून हलक्या सरी सुरू आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांनी पाणथळ क्षेत्रातील भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात केली आहे..Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन.जिल्ह्यात तीन टप्प्यांत भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी मे अखेर भात रोपवाटिका तयार करतात. काही शेतकरी मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर तर उर्वरित शेतकरी मॉन्सून सुरू झाल्यानंतर भात रोपवाटिका तयार करतात. जिल्ह्यातील सुमारे ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्र पाणथळ स्वरूपाचे आहे..मुसळधार पावसादरम्यान या भागात भातरोपांची लागवड करणे कठीण होते. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या क्षेत्रातील लागवडीच्या कामांना गती मिळते. यावर्षी जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातरोप पुनर्लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील पंधरा दिवसांत रोपांची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.