Paddy Cultivation Update: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात दहा दिवस मुसळधार पाऊस बरसल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्या, तरी लागवडीयोग्य पाऊस होत नसल्याने वरकस जमिनीतील भातरोप पुनर्लागवड रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे..जिल्ह्यात २८ जून ते ७ जुलै या कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यातील तीन-चार दिवस जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. मात्र ८ जुलैपासून पावसाचा जोर कमी झाला आहे..Paddy Replanting: सिंधुदुर्गमध्ये भातरोपे पुनर्लागवडीला वेग.गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दिवसभरात केवळ एक-दोन हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे वरकस जमिनीतील भातरोप पुनर्लागवड रखडली आहे. पावसाने उघडीप दिली असून, कडक ऊनही पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. .Paddy Sowing Delay: पाऊस लांबल्यामुळे भात पेरणी रखडली.त्यातच हवामान विभागाने आणखी पाच-सहा दिवस जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची धास्ती अधिकच वाढली आहे..एकीकडे पावसाअभावी वरकस जमिनीतील भातरोप पुनर्लागवड रखडली असली, तरी दुसरीकडे पाणथळ जमिनीतील पुनर्लागवड मात्र वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावरील पुनर्लागवड पूर्ण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.