Agriculture Loss: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता. २) सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. घाटपायथ्याच्या गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. या वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार अडचणीत आले आहेत..जिल्ह्याच्या वातावरणात २६ मार्चपासून मोठे बदल झाले. त्यानंतर काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू झाल्या. बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. पूर्वपट्ट्यातील भागात विजांचा गडगडाटही सुरू होता; परंतु पाऊस झाला नव्हता. मात्र, गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली. .Sindhudurg Rain Alert: सिंधुदुर्गात पावसाचे वातावरण.देवगड, वैभववाडी तालुक्यांच्या काही भागांत काही काळ हलक्या सरी सुरू होत्या. त्यानंतरही संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण कायम होते.दरम्यान, सायंकाळी चार वाजल्यापासून घाट परिसरात विजांचा गडगडाट आणि वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. वैभववाडी तालुक्यातील करूळ, भुईबावडा घाटपायथ्याच्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. .Unseasonal Rain: साडेबारा हजार हेक्टरला पाऊस, गारपिटीचा फटका .काही गावांना पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, देवगड, कणकवली तालुक्यांत रात्री उशिरा पाऊस झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाचे वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल, अशी स्थिती होती. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान सुरू आहे. वातावरण बदलल्याने आंबा पिकांवर मोठा परिणाम होत आहे. काजू बागांमध्येही जमिनीवर काजू बी पडून आहे. या पावसामुळे या बियांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..दोन दिवस पावसाचेहवामान विभागाने ४ एप्रिलपर्यंत पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या दृष्टीने पुढील दोन दिवस अतिशय धोकादायक मानले जात आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.