Weather Update: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (ता. १४) विजांचा गडगडाट झाला; मात्र अपेक्षित पाऊस न पडता केवळ शिडकावा झाला. सोमवारी (ता. १५) सकाळपासूनही जिल्ह्यात कडक ऊन असल्याने भात पिकासाठी आवश्यक ओलावा मिळत नसून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..६ ते ८ जूनदरम्यान जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनची गती मंदावली आहे. सुरुवातीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी केली. त्यानंतर एक-दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस झाला; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे..Waiting For Rain: नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा.पावसाळी वातावरण निर्माण होत असले तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने भात रोपांच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वैभववाडी, कणकवलीसह जिल्ह्यातील काही भागांत रविवारी जोरदार पावसाची चिन्हे दिसत होती. काही ठिकाणी विजांचा कडकडाटही झाला; मात्र पावसाचा केवळ शिडकावा झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. भात पेरणीनंतर शेतकरी रोपलागवडीसाठी शेताची पूर्वतयारी करतात. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने नांगरणी आणि इतर मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पुढील नियोजनाबाबत शेतकरी संभ्रमात आहेत..Waiting for Rain : तापलेल्या जमिनीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा.१८ जूनपर्यंत स्थितीत बदलाची शक्यता कमीहवामान विभागाने ११ ते १८ जून या कालावधीत जिल्ह्यात कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार सध्या पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मान्सूनची प्रगती मंदावल्याने १८ जूनपर्यंतही बहुतांश भागांत अशीच स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..उगवलेल्या रोपांची काळजी घेण्याचे आवाहनग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने शेतकऱ्यांना उगवलेल्या भात रोपांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रोपांमधील तण तातडीने काढून टाकावेत, जेणेकरून उपलब्ध ओलाव्याचा लाभ पिकाला मिळेल. गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार केलेल्या शेतकऱ्यांनी सरींमध्ये गिरीपुष्पाच्या पाल्याचे आच्छादन करावे, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.