Sindhudurg Storm Damage News: जिल्ह्याच्या बहुतांश भागाला गुरुवारी सायंकाळी (ता. ७) वादळी वाऱ्यांसह पावसाचा तडाखा बसला. वैभववाडी, कणकवली आणि मालवण तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली. अनेक ठिकाणी घरे व गोठ्यांवर झाडे कोसळून नुकसान झाले. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. आज (ता. ८) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे..जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. एकीकडे ढगाळ वातावरण, तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे नागरिक हैराण झाले होते. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यात पावसाचे वातावरण तयार झाले. पूर्व भागात काळोख पसरला. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले. वैभववाडी तालुक्यातील बहुतांश भागात सुमारे अर्धा तास जोरदार वारे वाहत होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.वैभववाडी पाठोपाठ कणकवली, कुडाळ आणि मालवण तालुक्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यामुळे वैभववाडी तालुक्यातील मांगवली, नाधवडे, कोकिसरे गावांमध्ये पडझडीचे प्रकार घडले. मांगवली येथील नंदकुमार राणे यांच्या गोठ्यावर झाड कोसळले, तर नाधवडे येथील रवींद्र खांडेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले..Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज .आखवणे भोम पुनर्वसन गावठणातील प्रकाश पडवळ, रविकांत नागप, आकाराम नागप, बाळकृष्ण नागप, विलास नागप आणि रामचंद्र नागप यांच्या घरांच्या छपरांचे वादळामुळे नुकसान झाले. मालवण तालुक्यातील सुकळवाड परिसरातही जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या..Maharashtra Weather Update: उष्ण हवामान अन् पावसाची शक्यता.सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यांतही पावसाचे वातावरण होते. किनारपट्टी भागात सायंकाळी उशिरापर्यंत जोरदार वारे वाहत होते. काही मार्गांवर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आखवणे पुनर्वसन गावठणात वीजखांब आणि वीजवाहिन्या कोसळल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत काही काळ वीजपुरवठा बंद होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.