Dam Update: जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांपैकी एक, तर ४२ लघू सिंचन प्रकल्पांपैकी फक्त आठच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तसेच २१ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे..जिल्ह्यातील तिलारी आंतरराज्य मोठ्या प्रकल्पात सध्या ७७.८९ टक्के पाणीसाठा आहे. देवधर, अरुणा आणि कोर्ले-सातेंडी या तीन मध्यम प्रकल्पांपैकी कोर्ले-सातेंडी हा एकमेव प्रकल्प शंभर टक्के भरला आहे..Dam Storage Dharasahiv: धाराशिवमध्ये धरणांतील आटलेल्या पाण्याने टंचाई गडद.जुलै महिना संपत आला असतानाही प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. साधारणतः जून आणि जुलै महिन्यांत जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने या कालावधीत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा असते..Reservoir Storage: प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात केवळ तीन टक्क्यांनी वाढ.जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती आणि बागायतीचा आधार लघु सिंचन प्रकल्पांवर आहे. या प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा राहिल्यास डिसेंबरनंतर सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. .जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, निळेली, पुळास, सनमटेब, हरकुळ-ओझरम, लोरे हे आठ प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तसेच २१ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी, तर आठ प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.