Paddy Crop Loss: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात पावसाअभावी झालेल्या भातपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. त्यांनी जिल्ह्यातील नेमळे आणि इन्सुली गावांतील भातपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच लोकसहभागातून गावातील जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या..जिल्ह्यात यंदा ३५ ते ३७ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा मोठा परिणाम भातपिकांवर झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, काही भागांत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी धोंडमिसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी नेमळे आणि इन्सुली परिसरातील भातपिकांची पाहणी केली..Water Conservation: जलसंधारणात हवा प्रत्यक्ष कृतीवर भर.या वेळी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष शिरोडकर, उपअभियंता आशुतोष यादव, कार्यकारी अभियंता सुरेश राणे आदी उपस्थित होते..Watershed Development: पाणलोट विकासातील आधुनिक अन् नावीन्यपूर्ण उपाययोजना.भातपिकांची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसातील खंड आणि त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस नसल्यामुळे करपा रोग नियंत्रणात आणणेही कठीण झाले आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे न भरता त्या पोचट अर्थात पोल राहिल्याचेही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यंदाच्या भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे..जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील व्हाळांची (नाल्यांची) पाहणी केली. पावसाचे उपलब्ध पाणी अडविण्यासाठी लोकसहभागातून कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पावसाचे उपलब्ध पाणी अडविणे, त्याचा साठा वाढविणे आणि भूजलपातळी टिकविण्यासाठी जलतारा यांसारख्या उपाययोजना गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..गावातील बंधारे दुरुस्त करून त्यात पाणी साठविणे, पाण्याचा प्रवाह अडविणे आणि उपलब्ध पाणी अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्याचे आवाहनही त्यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.