Crop Loss Assessment After Unseasonal Rain: वादळीवारा आणि मुसळधार पावसाने सिंधुदुर्गच्या अनेक भागांत शुक्रवारी (ता.८) सायंकाळी दाणादाण उडाली. वैभववाडीला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दोडामार्ग तालुक्याला देखील वादळीवाऱ्यांचा तडाखा बसला. त्यामुळे घोटगेवाडी येथे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. या पावसामुळे आंबा हंगाम संकटात आला आहे..गुरुवारी सायकांळी वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजल्यापासून सावंतवाडी, कुडाळ या परिसरांत पावसाने सुरुवात केली. कणकवली, वेंगुर्ला तालुक्यात देखील याचवेळेत पावसाच्या सरी कोसळल्या..Banana Crop Damage: खानदेशात वादळी पाऊस, उष्णतेचा केळीला फटका.परंतु वैभववाडी, फोंडा परिसरात पाच वाजण्याच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाले. सोसाट्याचा वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यापाठोपाठ मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. तालुक्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. वादळीवारे देखील वाहत होते..Heatwave Crop Damage: अकोला जिल्ह्यात उष्णतेने केळी बागा होरपळल्या.दोडामार्ग तालुक्याला वादळीवाऱ्याचा तडाखा बसला. घोटगेवाडी येथील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे जिल्हयातील अंतिम टप्प्प्यातील आंबा हंगाम संकटात सापडला आहे. पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आटोपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत..शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने ११ मे पर्यंत सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.