Kharif Crop: कोकणाच्या उत्तर भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असताना दक्षिण कोकणात मात्र पावसाने ओढ दिली आहे. ४ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवघा १३०७.७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के कमी आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे भात रोपांच्या पुनर्लागवडीला तब्बल ३५ ते ४० दिवसांचा विलंब झाला. परिणामी भाताला अपेक्षित फुटवे नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाचणीच्या उत्पादनालाही फटका बसण्याची भीती आहे..सिंधुदुर्गात यंदा ६ जूनला मॉन्सून दाखल झाला. सुरुवातीचे दोन दिवस पाऊस झाल्यानंतर अनेक दिवस खंड पडला. २४ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र उत्तर कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली..Rain Deficit in Vidarbh: अकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाची तूट.दुसरीकडे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गासह दक्षिण आणि उत्तर गोव्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ४ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्गात सरासरी २०२१.३ मिलिमीटरच्या तुलनेत १३०७.७ मिलिमीटर पाऊस झाला. .Vidarbha Kharif Sowing: विदर्भातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या.त्यामुळे पावसाची तूट ३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. दक्षिण गोव्यात ३०, तर उत्तर गोव्यात ३९ टक्के तूट आहे..पुनर्लागवडीला विलंबकमी पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडाचा सर्वाधिक परिणाम भात लागवडीवर झाला आहे. भात रोपांची उशिराने झाली असून, ऑगस्टमध्येही काही भागांत लागवडीची कामे सुरू आहेत. रोपे तयार झाल्यानंतर साधारण १५ ते २२ दिवसांत पुनर्लागवड होणे अपेक्षित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.