Solapur News : सीना नदीस आलेल्या पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याने अनेक गावांतील जीवनमान विस्कळित झाले आहे. .एकूण १११० मालमत्तांचे तब्बल ४७.६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली. पुरामुळे ८७४ गावरस्ते, ९६ स्मशानभूमी, ७९ समाजमंदिरे आणि ६१ ग्रामपंचायत इमारती बाधित झाल्या आहेत. यापैकी ५३ मालमत्तांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. .Sina River Flood : पुरात ९१ पाझर तलावांना तडे.आधीच निधीअभावी विकासकामे रखडलेली असताना, या नुकसानीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक गावांना शहराशी जोडणारे रस्ते वर्षानुवर्षे दुरवस्थेत आहेत, त्यात पुरामुळे खड्डे, पाण्याचे तळे आणि वाहतूक खंडित होण्याची समस्या वाढली आहे..Sina River Flood : पूरग्रस्त केवड, वाकाव गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट.सप्टेंबरमधील पुरामुळे ३७३ मालमत्तांचे ३० टक्क्यांपर्यंत, ५८४ मालमत्तांचे ३० ते ५० टक्के, तर १५३ मालमत्तांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. यात १४ ग्रामपंचायत कार्यालये, ७ समाजमंदिरे, १५ स्मशानभूमी आणि ११७ गावरस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. .दरम्यान, या ११७ रस्त्यांसह १४ ग्रामपंचायत कार्यालयांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असून, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..नुकसानीचे तपशील पुढीलप्रमाणेग्रामपंचायत कार्यालये २.२२ कोटीसमाजमंदिरे १.७९ कोटीस्मशानभूमी २.७१ कोटीगावरस्ते ४०.८८ कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.