Chana Management: हरभरा हे रब्बीमधील महत्त्वाचे पीक असून हे पीक कमी पाण्यात आणि कमी खत मात्रेमध्ये येणारे पीक आहे. रब्बी हंगामात महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु हरभरा लागवडीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन, आंतरमशागत आणि रोग किडींवर प्रतिबंधात्मक उपाय केल्यास शेतकऱ्यांना हरभरा पिकाच्या एकरी उत्पादनात वाढ मिळू शकते. .खत व्यवस्थापनहरभरा पिकाची पेरणी करताना शिफारशीत मात्रेत किंवा एकरी ४० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी खत दिले असल्यास पेरणीनंतर पिकाला खत देण्याची गरज पडत नाही. कारण हरभरा हे कडधान्यवर्गीय पीक आहे. त्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीद्वारे नत्राचे स्थिरीकरण करण्यात येते. .Chana Farming: नियोजनबद्ध हरभरा लागवडीत सातत्य.पाण्याची उपल्बधता कमी असलेल्या भागांमध्ये पीक फुलोरा अवस्थेत असताना युरिया २ टक्के म्हणजेच एक लिटर पाण्यात २० ग्रॅम युरिया घेऊन फवारणी करावी. त्यानंतर घाटे भरत असताना दुसरी फवारणी २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची करावी. एक लिटर पाण्यात २० ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट या प्रमाणे करावी. या दोन फवारण्यांमुळे पीक उत्पादनात वाढ होते. तसेच दाण्याच्या आकारात वाढ पहायला मिळते. असा सल्ला महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सहायोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार कुटे यांनी दिला..पाणी व्यवस्थापनहरभरा हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. परंतु त्याला योग्य वेळेला योग्य प्रमाणात पाणी दिल्यास त्याचे उत्पादन वाढते. तज्ज्ञांच्या मते तुषार सिंचन हे हरभरा पिकासाठी वरदान ठरले आहे. शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता तुषार सिंचन वापरावे. कारण हरभरा पिकाला पाटाने पाणी दिल्यास जमीन जास्त पाणी धरुन ठेवण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकामध्ये ओली मुळकुज प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. त्यासाठी तुषार सिंचन हे हरभऱ्यासाठी फायदेशीर आहे. पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी फुलकळी येते तेव्हा पहिले पाणी द्यावे. तर दुसरे पाणी घाटे भरत असताना द्यावे. तुषार सिंचनाने पाणी देताना तीन ते चार तास पाणी देणे पुरेसे असते. यामुळे हरभऱ्याचे उत्पादन ६० ते ६५ टक्क्यांनी वाढते. .आंतरमशागतहरभरा पिकाची पेरणी करताना तण नाशकाची फवारणी केल्यास तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते. तणविरहीत राहण्यासाठी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली कोळपणी करावी. तर दुसरी कोळपणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी.प्रभावी तण नियंत्रणासाठी हरभऱ्याच्या पेरणीनंतर लगेच २४ तासाच्या आत स्टॉम्प या तणानाशकाची ५०० लिटर पाण्यात २.५ लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. या तणनाशकाची फवारणी उगवणीपूर्वी करणं फार आवश्यक असते. पिकांच्या वाढीला हानी न पोहोचवता तण नियंत्रण करते. हा याचा महत्त्वाचा फायदा आहे. परंतु त्यावेळी जमिनीत ओल असणे गरजेचे असते. .कीड नियंत्रणहरभरा पिकावरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी एकरी किमान ५ कामगंध सापळे लावावेत. तसेच एकरी ३० ते ४० पक्षीथांबे सुद्धा लावावेत. जेणेकरुन किडींवर नियंत्रण ठेवता येईल. पीक फुलोऱ्यात येत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. जेणेकरुन किडींचा बंदोबस्त करण्यात मदत होईल. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल. इ. विषाणूची (१ मि.लि. प्रती लिटर पाणी)या प्रमाणे फवारणी करावी..प्रा. डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८सहयोगी प्राध्यापक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.