अमोल साळेLife Philosophy: इनर एक्सलन्स (Inner Excellence) या पुस्तकाने मला झपाटून टाकले आहे. हे पुस्तक माझ्या हातात फार उशिराने पडले, याची खंत नेहमी वाटत राहील. या पुस्तकात काही महत्त्वाची तत्त्वे सांगितली आहेत. खरं तर आयुष्य समजून घेण्यासाठी काही सोपे नियम असंही त्याला आपण म्हणून शकतो. हे नियम पुढीलप्रमाणे आहेत .सर्व काही भल्यासाठीचआयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती आणि घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि तुमची मदत करण्यासाठीच येते. हे सर्व तुमच्या फायद्यासाठीच घडत असतं.तुमचे विचार हेच तुमचे जगतुमचा स्वतःवर आणि जगावर जसा विश्वास असेल, तसंच तुमचं आयुष्य घडत जातं. थोडक्यात, तुमचे विचारच तुमच्या आयुष्याचा आरसा असतात..Book Review: गावगाड्याच्या वर्तमानाची यथार्थ मांडणी.भीतीचं कारणजेव्हा आपण फक्त स्वतःचाच विचार करतो (स्वार्थी होतो), तेव्हाच मनात भीती निर्माण होते.सर्वांच्या भावना सारख्याचवरून आपण कितीही वेगळे दिसत असलो, तरी आतून आपल्या सर्वांच्या गरजा आणि इच्छा सारख्याच असतात. प्रत्येकाला प्रेम, आनंद आणि सुरक्षितताच हवी असते..प्रत्येक जण प्रयत्न करत असतोकोणतीही व्यक्ती मुद्दाम वाईट नसते. ज्याची जेवढी समज आणि कुवत असते, त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या परीने सर्वोत्तम वागण्याचाच प्रयत्न करत असतो.नकाशा म्हणजे रस्ता नव्हेनकाशावर रस्ता पाहणे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चालणे यात फरक असतो. तसेच आपल्याला जे ‘वाटतं’ (नकाशा) तेच पूर्ण ‘सत्य’ (रस्ता) असेल असं नाही. वास्तवात गोष्टी वेगळ्या असू शकतात..Book Review: एआय देईल ऊस शेतीला नवी दिशा.तुम्ही आणि तुमचे मन वेगळे आहाततुम्ही म्हणजे तुमचे विचार किंवा तुमचे मन नव्हे. तुम्ही त्या विचारांना लांबून पाहणारे ‘मालक’ आहात.दृष्टिकोन बदलासमोर आलेली अडचण ही खरी समस्या नसतेच, तर त्या अडचणीकडे पाहण्याचा तुमचा ‘दृष्टिकोन’ किंवा तुम्ही त्याबद्दल काय विचार करता, ही खरी समस्या असते..अपयश असं काही नसतंआयुष्यात कधीच ‘अपयश’ येत नसतं. जे घडतं, तो फक्त एक ‘धडा’ असतो. त्यातून शिकून आपण पुढच्या वेळी सुधारणा करायची असते.खरी ताकदज्या माणसाचं स्वतःच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण असतं, तोच या जगातला सर्वात शक्तिशाली माणूस असतो.७०८३५८१२८१(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.