Sticky Traps Types: आजकाल शेतीमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. वारंवार फवारणी केल्याने खर्च वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. अशा वेळी चिकट सापळे ही किडींची संख्या कमी करण्यासाठी आणि प्रादुर्भाव लवकर ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते. चिकट सापळे वापरल्यास किड नियंत्रण स्वस्तात, सुरक्षित पद्धतीने करता येते. रासायनिक फवारणी कमी होते, पिकांचे नुकसान घटते आणि उत्पादन चांगले मिळते. .चिकट सापळे म्हणजे काय?चिकट सापळ्यांना इंग्रजीत स्टिकी ट्रॅप्स म्हटलं जातं. हे विशिष्ट रंगाचे प्लास्टिक किंवा कार्डबोर्डचे फलक असतात. त्यावर चिकट पदार्थ लावलेला असतो. कीटक रंगाकडे आकर्षित होतात आणि सापळ्यावर चिकटून मरतात. यामुळे किडींची संख्या कमी होते आणि शेतकऱ्यांना वेळीच प्रादुर्भावाची माहिती मिळते..Pheromone Trap Types: कामगंध सापळ्यांचे प्रकार आणि त्याचा पीकनिहाय वापर.चिकट सापळ्यांचे प्रकारकिडींच्या डोळ्यांची रचना वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळ्या रंगांचे सापळे वापरले जातात.१. पिवळे चिकट सापळेमावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे यांसाठी वापरावे.२. निळे चिकट सापळेफुलकिडे आणि पाने पोखरणाऱ्या अळीचे पतंग (लीफ मायनर) यांसाठी वापरतात.३. पांढरे चिकट सापळेउडद्या भुंगेरे व काही ढेकूणवर्गीय किडींसाठी उपयुक्त..सापळ्यांचे प्रमाण१५×३० सें.मी. सापळाकिड नियंत्रणासाठी १०० चौ.मी. साठी एक सापळा तर सर्वेक्षणासाठी : १००० चौ.मी. साठी एक सापळा याप्रमाणे वापरावे.भाजीपाला पिकांमधील मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी यांसाठी १०० ते ४०० सापळे प्रति एकर वापरावे.कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी पिकांसाठी ३०×४० सें.मी. आकाराचे ३६ ते ८० सापळे प्रति एकर वापरावेत..चिकट सापळे वापरताना काळजीपांढरी माशी व तुडतुडे या किड्यांसाठी पिकाच्या उंचीपेक्षा १५ सें.मी. खाली लावावेत.मावा व फुलकिडे या किडींसाठी पिकाच्या उंचीइतके किंवा १५ सें.मी. वर लावावेत.पिकांच्या ओळीपासून २० सेंमी अंतरावर लावावेत.वाऱ्याचा वेग व दिशा लक्षात घेऊन लावावेत किंवा अत्यंत वेगाने वारे वाहत असल्यास त्या वेळेपुरते काढून घ्यावेत.ईशान्य व नैऋत्य दिशेला सूर्याच्या दिशेने तिरकस लावावेत.दर ७ ते १० दिवसांनी कीटकांनी माखलेले सापळे ओल्या कापडाने पुसून घेऊन कोरडे करावेत. पुन्हा एरंडी तेल किंवा पांढरे ग्रीस या पैकी कोणताही चिकट पदार्थ लावावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.