Silver Price Hits Record High In India: चांदीच्या दराने सोमवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. चांदीने पहिल्यांदाच प्रतिकिलो ३ लाखांचा टप्पा पार केला. गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे चांदी वधारली आहे. चांदीच्या उसळीमुळे कमोडिटी बाजारात मोठी खळबळ उडाली. .मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीच्या चांदीचा वायदा दर एका दिवसात १३,५५३ रुपयांनी म्हणजेच ४.७१ टक्के वाढून प्रतिकिलो ३ लाख १ हजार ३१५ रुपयांवर पोहोचला. हा चांदी दराचा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक आहे. .आंतरराष्ट्रीय बाजारात, मार्च डिलिव्हरीच्या चांदीच्या वायदा करारात दर ५.८१ डॉलरने म्हणजेच ६.५६ टक्के वाढून प्रतिऔंस (एक औंस = सुमारे २८.३५ ग्रॅम) ९४.३५ डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर गेला. औद्योगिक मागणीत वाढ आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे चांदीला झळाळी मिळाली आहे, जी अलीकडील काही दिवसात सोन्यापेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे..Benefits Of Silver Jewellery : चांदीचे दागिने घालण्याचे फायदे किती? वाचा एका क्लिकवर.चांदीच्या दरात २०२५ मध्ये जोरदार तेजी दिसून आली होती. आता २०२६ वर्षात आतापर्यंतच्या १९ दिवसांत चांदी दराने सर्व विक्रम मोडले आहे. एकट्या जानेवारी महिन्यात चांदीच्या दरात ६५,६१४ रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ३५ हजार ७०१ रुपये होता. आता हा दर प्रति किलो ३ लाख पार झाला आहे..Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल.देशात २०२५ मध्ये ९.२ अब्ज डॉलर किमतीची चांदी आयात करण्यात आली होती. यामुळे भारत जगातील सर्वात मोठा चांदीचा खरेदीदार बनला..सोन्याच्या दरातही वाढसोन्याच्या दरातही वाढ सुरुच आहे. एमसीएक्सवर आज व्यवहार सुरु होताच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम (प्रति तोळा) १ लाख ४५ हजार ५०० रुपयांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. याआधी शुक्रवारी (१७ जानेवारी) सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ५१७ रुपयांवर बंद झाला होता. याचाच अर्थ केवळ एका सत्रात सोन्याच्या दरात २,९८३ रुपयांची वाढ झाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला वाढत चाललेली मागणी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेने पुढील काही आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या काळात सोने, चांदीचा दर वाढत चालल्याने या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.