Paithan News: मराठवाड्यातील रेशीम उद्योगाचे गाव म्हणून पुढे येत असलेल्या देवगाव येथील शेतकऱ्यांना यंदा अत्यंत प्रतिकूल स्थितीतही चांगला आर्थिक आधार देण्याचे काम या उद्योगाने केले आहे. माहितीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान गावातील एकूण शेतकऱ्यांपैकी ४७ शेतकऱ्यांना १ कोटी ३३ लाखांचे अर्थार्जन या उद्योगातून झाले आहे. त्यामुळे गावातील रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. .पैठण तालुक्यातील देवगाव तसे पारंपरिक खरीप व रब्बी पिकाचे गाव. परंतु अलीकडच्या काही वर्षांत गावातील शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आणि गावात आर्थिक क्रांतीबरोबरच शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ लागल्या. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवगावच्या गाव शिवारात सुमारे २२५ एकरच्या आसपास तुती लागवड झाली असून १४० पेक्षा जास्त शेतकरी या रेशीम उद्योगाशी जोडले गेले आहेत..Silk Production: पंचवीस एकराच्या तुती रेशीम फार्मवर विविध कामांना गती.यामध्ये आताच्या घडीला प्रत्यक्ष उत्पादन घेणाऱ्या ८० शेतकऱ्यांसह नव्याने येत्या काही दिवसांत जोडल्या जाणाऱ्या ६३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. रेशीम विभागाच्या वतीने गावातील शहादेव ढाकणे व सदाशिव गीते या दोन शेतकऱ्यांना ‘रेशीम रत्न’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यंदा पावसाळ्यात अति पावसाने व पावसाळ्यानंतरही लांबलेल्या पावसाने खरिपाची पूर्ण वाताहात केली..अशा स्थितीत देवगावातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना तुतीने तारण्याचे काम केले. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या रेशीम कोष उत्पादनावर परिणाम झाला असला तरी मिळालेले उत्पन्न शेतकऱ्यांना समाधान देताना दिसत आहे. रेशीम शेतकरी मंडळ देवगावअंतर्गत (ता. पैठण) रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील केवळ ४७ शेतकऱ्यांना १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीम कोष उत्पन्न १ कोटी ३३ लाख ७८ हजार ५७५ रुपये आले आहे..Silk Farming: रेशीम संगोपनगृहात उष्ण तापमान राखण्यासाठी प्रयत्न.देवगाव व्हावे रेशीमगावअलीकडेच वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, उपसचिव तुषार पवार यांच्यासह रेशीमचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी देवगावला भेट दिली. भेटीत सिन्हा यांनी मधाच्या गावाप्रमाणे रेशीम गाव म्हणून देवगावचा नावलौकिक व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला दुजोरा देताना रेशीम कोष उत्पादकांनी त्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची तयारी त्यांच्यासमोर बोलून दाखवली होती..पारंपरिक पिकात शेतकऱ्यांची कायम परवड व्हायची. कोटींत उत्पन्न गावाचे कधी दिसत नव्हते. रेशीम उद्योगाने मात्र आम्हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार देण्याचे काम केले. मी स्वतः रेशीम उद्योग करतो. सातत्याने शेतकरी या उद्योगाकडे वळत आहेत.योगेश कोठुळे, सरपंच, देवगाव, ता. पैठण.उत्पादनाची शाश्वती आणि उत्पन्नाची हमी या बाबींमुळे गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. खास करून युवा वर्ग रेशीमकडे आकर्षित होतो आहे. शहादेव ढाकणे, रेशीम रत्न, देवगाव, ता. पैठण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.