Chh. Sambhajinagar News : जिल्हा रेशीम कार्यालयाकडून २६ लाख वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सूरू राहील, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी दिली. श्री. डेंगळे म्हणाले, की वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर येथील रेशीम संचालनालयाने १ सप्टेंबरला ‘रेशीम दिन’ साजरा करत रेशीम संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. .यामधून मागील दोन वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांनी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे नोंदणी केली, परंतु काही तांत्रिक, आर्थिक व इतर वैयक्तिक कारणास्तव तुती लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीद्वारे रेशीम योजनेची परिपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. .Tree Plantation : सामाजिक दायित्व जाणत प्रत्येकाने वृक्षलागवड करावी.रेशीम योजनेची सविस्तर माहिती असणारे माहितिपत्रक देवून रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच रेशीम योजनेबाबत शेतकऱ्यांचे अभिप्रायदेखील नोंदविण्यात येणार आहेत. या अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १५८० शेतकऱ्यांना भेटीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या तुती वृक्ष लागवडीसाठी केंद्र शासनाचे सिल्क समग्र-२ तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अर्थसाह्य देखील करण्यात येणार आहे..Mulberry Cultivation : राज्यात ३७६५ एकरांनी वाढले तुती लागवडीचे उद्दिष्ट.वृक्षांची गणना अमृतवृक्ष ॲपद्वारेमुख्यमंत्री यांनी २०२५-२६ मधील पावसाळी हंगामात राज्यामध्ये १० कोटी वृक्ष लागवड लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट विविध विभागांना ठरवून दिले आहे. त्यापैकी ४ कोटी तुती वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे रेशीम संचालनालयास देण्यात आले आहे. संचालनालयाचे या उद्दिष्टांपैकी २६ लाख तुती वृक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लावण्यात येणार आहेत. लावल्या जाणाऱ्या तुती वृक्षांची गणना अमृतवृक्ष या मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी रेशीम विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्री.डेंगळे यांनी केले आहे.\.मजुरी व शेडसाठीचा लाभ‘मनरेगा’अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यात येते. एक एकर तुती वृक्ष लागवड, जोपासना व रेशीम कोष उत्पादन यासाठी तीन वर्षांत २ लाख १२ हजार ७८४ मजुरी दिली जाणार आहे.तसेच रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी स्वरूपात ६६ हजार ४५६, तर साहित्यासाठी १ लाख ५३ हजार असे एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये अनुदान दिले जाणार आहेत..सिल्क समग्र-२ योजनेतही सहभाग संधीबहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र २ योजनेत सहभाग घेता येईल. १ एकर तुती वृक्ष लागवडीसाठी ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार, संगोपनगृह बांधकामासाठी २ लाख ४३ हजार ७५०, किटक संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० आणि निर्जंतुकीकरण औषधांसाठी ३ हजार ७५० रुपये अनुदान काम पूर्ण झाल्यानंतर दिले जातात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.