Solapur News : जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ ही विशेष मोहीम १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दोन वर्षांपूर्वी रेशीम उद्योगासाठी नोंदणी केलेल्या, परंतु प्रत्यक्ष तुती लागवड न केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा प्रवृत्त करणे, तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेणे हा आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांनी दिली..ही मोहीम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राबवली जात असून, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. एका गावातील किमान पाच शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने, ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज सादर करावा लागतो. यासाठी प्रति एकर ५०० नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात भरावे लागते..Sericulture Farming: रेशीम शेती, चॉकी सेंटरद्वारे उत्पन्नासोबतच शेतकऱ्यांची सेवा.राज्य शासनाने चालू पावसाळ्यात १० कोटी तुती वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यापैकी ४ कोटी वृक्षांचे उद्दिष्ट रेशीम संचालनालयाला दिले गेले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी २४ लाख वृक्षांची (सुमारे ४०० एकर) लागवड निश्चित करण्यात आली आहे. .शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि शेतीपूरक अशा रेशीम उद्योगात सहभाग घेऊन कोष निर्मितीद्वारे उत्पन्नवाढीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, रेशीम पार्क, गट नं. ४२३/२, मौजे हिरज (ता. उत्तर सोलापूर) यांच्या वतीने करण्यात आले आहे..Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून रोखला उझी माशीचा प्रादुर्भाव.मनरेगा अंतर्गत मिळणारे लाभतुती लागवड व जोपासना: २,१२,७८४ (३ वर्षांतील मजुरी)किटक संगोपनगृह बांधकाम: ६६,४५६ (मजुरी)साहित्य खर्च: १,५३,०००एकूण लाभ: ४,३२,२४० (३ वर्षांत).बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी “सिल्क समग्र २” योजनातुती लागवड: ४५,०००सिंचन व्यवस्था: ४५,०००संगोपनगृह बांधकाम: २,४३,७५०संगोपन साहित्य: ३७,५००निर्जतुकीकरण औषधे: ३,७५०सर्व अनुदान काम पूर्ण केल्यावर मंजूर केले जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.