डॉ. गणेश शेंडगे, डॉ. प्रणव पाटीलसिलिकॉनयुक्त खतांचा वापर केल्यास यातील सिलिसिक आम्ल जमिनीच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम करते. जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ होण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते..ऊस पिकामध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सिलिकॉनचा वापर अतिशय प्रभावी ठरतो. ऊस हे सिलिकॉनची साठवणूक करणारे पीक म्हणून ओळखले जाते. तृणधान्य पिकात नत्रापेक्षाही जास्त प्रमाणात सिलिकॉनची गरज भासते. या पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण हे नत्र, स्फुरद आणि पालाशपेक्षाही जास्त आढळते. सिलिकॉन या अन्नद्रव्याची कमतरता हे देखील कमी उत्पादन येण्यामागचे कारण असू शकते..Silicon Use In Maize Farming: मका उत्पादनवाढीसाठी सिलिकॉन फायदेशीर.सिलिकॉन वापराचे फायदेसिलिकॉन हे वनस्पतीच्या पानांच्या पेशीभित्तीवर सिलिका जेल या स्वरूपात साठून राहते. त्यामुळे त्याचा पानांवर जाड थर निर्माण होतो. या साचलेल्या थरामुळे वनस्पतींमध्ये शक्ती निर्माण होऊन वनस्पती सरळ वाढतात. त्यामुळे त्यांचे जमिनीवर लोळण्याचे प्रमाण कमी होते. पाने सरळ वाढल्याने एकमेकांची सावली पानांवर पडत नाही. या सर्वांमुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत होऊन उंची, खोडाची जाडी आणि फुटव्यांची संख्या वाढते. साखरेचा गोडवा वाढतो. तसेच साठवण होऊन त्याच स्वरूपात ती टिकून राहते, यासाठी सिलिकॉनचा उपयोग होतो..उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी होण्यास मदत होऊन जलधारणाशक्ती वाढते. जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होऊन जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.सिलिकॉन वापराने नत्राचा निचरा कमी होतो, त्यामुळे त्यांचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच स्फुरदाचे स्थिरीकरण कमी होऊन स्थिर अवस्थेतला स्फुरद पुन्हा उपलब्ध होतो. अशाप्रकारे स्फुरदाची उपलब्धता ४० ते ७० टक्के आणि पोटॅशची उपलब्धता २० टक्क्यांपर्यंत वाढविली जाते. अशाच प्रकारे अन्नद्रव्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढविली जाते. त्यामुळे फुटवे जास्त फुटणे, उसाची उंची वाढणे, कांडीची जाडी व लांबी वाढणे इत्यादी बाबीवर अनुकूल परिणाम मिळतात, पिकाची उत्तम वाढ होते..Silicon Valley Bank : सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडाल्यामुळे एवढा गहजब कशासाठी?.सिलिकॉन हे पिकासाठी महत्त्वाचे व उपयुक्त अन्नद्रव्य आहे. पिकांना पूर्वी हा घटक जमीन, पाण्याद्वारे उपलब्ध होत असे. एकाच जमिनीमध्ये सातत्याने तीच ती पिके घेत राहिल्याने अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे. जमिनीतील सिलिकॉनची मात्रा कमी झाल्याने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. सिलिकॉन पुरवठा करण्यासाठी पारंपरिक तसेच वनस्पतीच्या अवशेषांचा फेरवापर व रासायनिक घटकांचा वापर केला जातो. रासायनिक स्रोतांमध्ये कॅल्शिअम सिलिकेट व मॅग्नेशिअम सिलिकेट यांचा समावेश होतो. .सिलिकॉनयुक्त खतांचा वापरसिलिकॉनयुक्त खतांचा वापर केल्यास यातील सिलिसिक आम्ल जमिनीच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम करते. जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ होण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते.जिवाणूंचे कार्य सुलभ होते. मुळाच्या पोकळ्या मजबूत असल्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा सुलभरीत्या होतो. तसेच जमिनीचा सामू व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून आले आहे. जास्त तापमानामध्ये जमिनीतून होणारे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते..सिलिकॉनची कमतरता असल्यास पानांमधून बाष्पीभवनाचा वेग सुमारे ३० टक्क्यांनी जास्त असल्याचे संशोधनात आढळले आहे. मात्र याचा पुरवठा उत्तम असल्यास कमी पाण्याचा पिकावरील ताणही कमी राहतो. दुष्काळी परिस्थितीतही पीक तग धरते.अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी कॅल्शिअम सिलिकेट ८३२ किलो प्रति हेक्टरी ऊस लागवडीच्या वेळेस एकदाच वापरले असता ४०० किलो प्रति हेक्टरी सिलिकॉन उसाला मिळते. जिवाणू खतांचे मिश्रण वापरून उसाच्या पाचटाचे कंपोस्ट दिल्यास त्या माध्यमातून देखील उसाला सिलिकॉनचा पुरवठा होतो.- डॉ. गणेश शेंडगे ९९२१०९००७९(प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.